Thursday, October 15, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

तब्बल २३ विद्यार्थ्यांची ९० टक्क्यांवरील दमदार कामगिरी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
in चोपडा, शैक्षणिक
0
विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेच्या निकालात कु. स्वरा विनीत हरताळकर हिने तब्बल १०० टक्के गुण मिळवत विद्यालयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी अभूतपूर्व कामगिरी केली आहे.

कु. स्वरा विनीत हरताळकर

स्वरा हिने केवळ विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला नसून, संपूर्ण चोपडा तालुक्यात अव्वल येण्याचा बहुमानही पटकावला आहे. विशेष म्हणजे, विवेकानंद विद्यालयाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या विद्यार्थिनीने शंभर टक्के गुणांचा मानाचा टप्पा गाठल्याने संपूर्ण परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वराच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तिच्या पालकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “स्वराने जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे आमच्या कुटुंबासह विद्यालयाचाही गौरव वाढला आहे.”

गुणवत्तेची उज्वल परंपरा कायम 

विद्यालयाचा एकूण निकाल ९९.२८ टक्के लागला असून, तब्बल २३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत गुणवत्तेची भक्कम परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

  • कु. सानवी अतुल पाटील — ९७.८०% (द्वितीय)
  • चि. हर्षल भरत पाटील — ९७.६०% (तृतीय)
  • कु. ऋतुजा किशोर पाटील — ९७.६०% (तृतीय)
  • चि. सोहम हितेश जैन — ९७% (चतुर्थ)

विद्यालयाच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, माजी अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर तसेच सर्व विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.

तसेच विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे, पवन लाठी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आशा चित्ते, संजय सोनवणे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी. जी. पाटील, इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या भारती पंजाबी, गौरी शुक्ल, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका रेवती दीक्षित व योगिता केंगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“विद्यार्थ्यांची अथक मेहनत, पालकांचे सातत्यपूर्ण सहकार्य आणि शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन यामुळेच हे उज्ज्वल यश शक्य झाले,” असे गौरवोद्गार विद्यालयाच्या वतीने काढण्यात आले.

स्वरा हरताळकर हिची ही यशोगाथा आगामी काळात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Views: 135
Previous Post

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

Next Post

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Next Post
सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us