Thursday, October 15, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
in क्राईम, जळगांळ जिल्हा
0
सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई दि. ०९ मे २०२६ रोजी जळगाव येथे करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे सब-कॉन्ट्रॅक्टर असून जळगाव शहरातील वॉर्ड क्रमांक १४ परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामा संदर्भातील बिल मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करीत होते. संबंधित कामाचे एकूण बिल सुमारे ८० लाख ३१ हजार ४८२ रुपये इतके होते. त्यापैकी काही रक्कम अदा करण्यात आली होती, तर उर्वरित बिल मंजूर करून देण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी तक्रारदाराकडे तब्बल १८ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले.

तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे लेखी तक्रार दाखल केली होती. विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने तडजोडीअंती १५ लाख रुपयांवर सहमती दर्शवून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये स्वीकारण्याचे निश्चित केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. दि. ०९ मे रोजी आरोपी योगेश अहिरे यांनी तक्रारदाराकडून ५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. सदर रक्कम त्यांच्या वाहनातील सीटखाली ठेवण्यात आल्याचेही कारवाई दरम्यान उघड झाले. यानंतर एसीबी पथकाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये कलम ७, ७अ व १२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक योगेश ठाकूर करीत आहेत. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले असून, कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करीत असल्यास तत्काळ विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे म्हटले आहे.

Views: 400
Previous Post

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

Next Post

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us