Tuesday, July 7, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
in क्राईम, पोलीस डायरी
0
जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकाऱ्याकडून तब्बल १ कोटी ७७ लाख ४४ हजार ०७५ रुपयांचा सोन्या-चांदीचा व रोख रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश बाबूराव बारी (वय ५५) हे उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय, जामनेर येथे कार्यरत आहेत. त्यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या मालमत्तेची तपासणी व झडती कारवाई केली. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याचे हार, बांगड्या, अंगठ्या व इतर दागिन्यांचा समावेश असून रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १,७७,४४,०७५ रुपये इतकी असल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० मे २०२६ रोजी ही कारवाई केली. आरोपी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे सहकार विभागात एकच खळबळ उडाली असून एसीबीकडून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

Post Views: 174
Previous Post

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

Next Post

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us