सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

0
InShot_20260509_005015636

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेचा निकाल ८०.५५ टक्के लागला आहे.

विद्यालयातून कु. प्रणाली अमोल सोनार हिने ८७.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक द्वारकेश आबा चौधरी (७८ टक्के) याने मिळविला, तर तृतीय क्रमांक लीना सुनिल कोळी हिने ७७.६० टक्के गुणांसह प्राप्त केला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष द्रविलाल पाटील, सचिव जवरीलालजी जैन, सहसचिव भानुदास पाटील, संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. आर. एम. चौधरी सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!