Thursday, October 15, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
in चोपडा, शासकीय
0
चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील दि. 1 जानेवारी 2011 पर्यंत अस्तित्वात असलेल्या निवासी अतिक्रमणांच्या नियमितीकरणाबाबत उपविभागीय अधिकारी, अमळनेर मयुर भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा नगरपरिषद मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्यासह नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीस उपस्थित प्रांत मयूर भंगाळे यांच्यासह तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी रामनिवास झंवर व नगरपालिकेतील इतर अधिकारी वर्ग…

बैठकीदरम्यान चोपडा शहरातील विविध भागांमधील शासकीय जमिनी, त्यावरील निवासी अतिक्रमणांची सद्यस्थिती, संबंधित आरक्षणे तसेच शासन निर्णयानुसार पात्रतेच्या अटी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना नियमितीकरण प्रक्रियेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या. योजनेबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी यासाठी शहरातील प्रमुख चौक व सार्वजनिक ठिकाणी माहितीपर बॅनर लावणे, घंटागाडी तसेच विविध प्रसार माध्यमांच्या साहाय्याने प्रचार-प्रसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संबंधित नागरिकांना अर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी तात्काळ अर्ज वितरण सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले.

नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या उद्देशाने स्वतंत्र ‘अतिक्रमण नियमानुकूल मदत कक्ष’ (Help Desk) सुरू करण्याबाबत आदेश देण्यात आले असून, उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्या उपस्थितीत सदर मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला. या मदत कक्षामार्फत नागरिकांना अर्ज भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रतेच्या अटी तसेच नियमितीकरण प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

अर्ज स्विकारताना उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्यासह तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी रामनिवास झंवर व इतर

यावेळी काही नागरिक अर्ज व आवश्यक कागदपत्रांबाबत चौकशीसाठी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांच्या हस्ते संबंधितांना अर्जांचे वितरण करण्यात आले तसेच ही माहिती व अर्ज प्रक्रिया जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमितीकरणासाठी पात्र ठरणाऱ्या नागरिकांनी शासन निर्णयाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज सादर करावेत तसेच अर्ज प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी मदत कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, अमळनेर श्री. मयुर भंगाळे यांनी केले आहे.

Views: 476
Previous Post

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Next Post

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us