Friday, July 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
in चोपडा, जळगांळ जिल्हा, शैक्षणिक
0
दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे होणारे उपद्रव तसेच मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या सूचना फलकावर भटक्या जनावरांबाबत जनजागृतीपर छायाचित्रे, माहिती व संदेश प्रदर्शित करण्यात आले. या जनजागृती फलकाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

भटक्या जनावरांमुळे होणारे उपद्रव व मानव-श्वान संघर्षाबाबत आयोजित जनजागृती फलकाचे उद्घाटन करतांना प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे…

यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, प्रा. डॉ. बी. एम. सपकाळ, ए. बी. सूर्यवंशी, ज्युनिअर विभागाचे श्री. बोरसे, डॉ. विशाल हौसे, डॉ. आर. आर. पाटील, प्राणीशास्त्र विभागप्रमुख व प्राणी जन्म नियंत्रण नोडल अधिकारी डॉ. एच. जी. सदाफुले, डॉ. मयूर सोनवणे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. एच. जी. सदाफुले यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून अशा जनजागृती उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना माहितीपर पत्रकांचे (पॅम्प्लेट) वाटप करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये जनजागृती फलक लावून भटक्या जनावरांपासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाची काळजी, मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांनी घ्यावयाची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयूर एम. सोनवणे यांनी केले, तर आभार अदिती मोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अश्विनी पवार, रामेश्वरी पाटील आणि भरत भालेराव यांचे सहकार्य लाभले.

Post Views: 27
Previous Post

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us