Thursday, October 15, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या शुभहस्ते पार पडला सोहळा

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
in महाराष्ट्र
0
बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव सेवा केंद्र या नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज चोपडा तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात व धार्मिक विधीवत वातावरणात संपन्न झाले. भूमिपूजन प्रसंगी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी श्रीफळ वाढवून तसेच टिकाव मारून नूतन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ केला.

भूमिपूजन प्रसंगी विधिवत पूजा करतांना तहसीलदार भाऊसाहेब थोरात

यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी संस्थेच्या सुरू असलेल्या निस्वार्थ सेवाकार्याचे कौतुक करत, बेवारस व निराधार मनोरुग्णांना सुरक्षित निवारा, उपचार आणि सन्मानाचे जीवन देण्यासाठी उभारली जाणारी ही इमारत समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

संस्थेच्या या नूतन प्रकल्पामुळे बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी अधिक सक्षम व सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असून, समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी या सेवाकार्यात सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी वेले आखातवाडे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींसह शामसिंग परदेशी, मंडळधिकारी मनोज साळुंखे, भूषण पाटील, माजी उपसरपंच विनोद पाटील, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, मनोज चित्रकथी, अपनाही घर या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, संचालक अजय जोहरी, विजय पाटील, दिनेश पवार, पत्रकार बांधव तसेच संस्थेचे समन्वयक संदीप ओली आदी मान्यवर उपस्थित होते.

अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा केंद्र”च्या नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करताना तहसीलदार भाऊसाहेब थोरात

कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून संपूर्ण परिसरात सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळाले. उपस्थितांनी नूतन इमारतीच्या उभारणीसाठी शुभेच्छा देत संस्थेच्या कार्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Views: 746
Previous Post

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

Next Post

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

Next Post
डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

चोपड्यात ‘मारुती फिटनेस जिम’चा भव्य उद्घाटन सोहळा

by टीम लोकप्रवाह
October 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 10 : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जागरूकता वाढावी, तसेच युवकांना शरीरसौष्ठव आणि फिटनेससाठी आधुनिक व्यासपीठ...

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us