लोकप्रवाह, चोपडा दि. १६ जुलै – येथील चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यात मागील ७ सात वर्षापासून फरार असणाऱ्या ज्ञानेश्वर काळू देवराज, वय ६२, रा.गलंगी ता. चोपडा या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगांव जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांमधील पाहिजे / फरार आरोपीतांचे शोध कामी पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगांव विभाग अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे अशांनी जळगांव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना योग्य ते मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पोहेकॉ. २७०७ संदिप पाटील, पोना. २३०६ प्रविण मांडोळे, पोना. २९९३ रविंद्र पाटील व पोना. १५८८ परेश महाजन अशांचे पथक तयार करुन रवाना केले होते.
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन गुरनं.३३/२०१५ भादंवि क.३५२, ३५३, २९४, ३२३, ५०४ या गुन्ह्यातील सुमारे ७ वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी नामे ज्ञानेश्वर काळू देवराज, वय ६२, रा.गलंगी ता. चोपडा हा गलंगी गावात आला आहे. अशी गोपनिय बातमी मिळाल्याने वरील पथकातील पोहेकॉ.२७०७ संदिप पाटील, पोना. २३०६ प्रविण मांडोळे, पोना. २९९३ रविंद्र पाटील व पोना. १५८८ परेश महाजन अशांनी गलंगी ता. चोपडा येथे जावून आरोपीतास आज दि. १६.०७.२०२२ रोजी ताब्यात घेवून गजाआड केले.