Monday, July 27, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात पोद्दार शाळेविरूध्द असंतोषाचे वातावरण; कारवाईची मागणी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 16, 2022
in सामाजिक
0
चोपड्यात पोद्दार शाळेविरूध्द असंतोषाचे वातावरण; कारवाईची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. १६ जुलै – शहरातील पोद्दार शाळेच्या प्राथमिक विभागाने “मंदिर – मशिद दर्शन” उपक्रमामुळे नागरिक व पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून चौकशी करुन संबधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे हिंदुत्ववादी संघटनातर्फे गटशिक्षणाधिका-यांकडे करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोद्दार शाळेच्या प्रशासनाने प्रथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी दि.९ जुलैला मंदिर – मशीद दर्शन हा सनसनाटी आणि असंतोष पसरविणारा उपक्रम राबविला. त्या अंतर्गत श्री विठ्ठल मंदिरात दर्शन झाल्यानंतर शहरातील एका मशिदीत विद्यार्थ्यांना नेण्यात आले. त्यामुळे नागरिक व हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी संबधितांना जाब विचारला तसेच गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की, उदयपूर व अमरावती या ठिकाणी अत्यंत क्रुर घटना घडल्या असतांना व सर्वत्र सामाजिक वातावरण दूषित असतांना संवेदनशील चोपडा शहरात मंदिर मशीद दर्शन उपक्रम कसा राबविला गेला? त्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेतली होती का? विद्यार्थी पारंपारिक वेषभूषेत होते ते भगव्या ध्वजासह मशिदीत जाताना कोणी माथेफिरूने गैरकृत्य केले असते तर त्याची जबाबदारी कुणाची? पोद्दार शाळेने विचित्र उद्देशाने हा वातावरण दूषित करणारा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे या शाळेच्या विश्वस्त व त्यास जबाबदार शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. यापुढे तालुक्यात शालेय उपक्रम राबवितांना शिक्षण विभागाच्या परवानगीचे बंधन असावे अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर भाजपचे शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा संयोजक डॅा.राहुल चौधरी, यशवंत चौधरी, शिवसेना शहरप्रमुख नरेश महाजन, रा.स्व.संघाचे कार्यवाह मनोज विसावे, राजेंद्र स्वामी, गौरव अग्रवाल, शाम सोनार, गौरव सोनार, भाजप सरचिटणीस मनोहर बडगुजर, सुनिल सोनगिरे, भाजयुमोचे प्रकाश पाटील, लक्ष्मण माळी, राजवर्धन पाटील, अजय भोई, विशाल भोई, संग्राम परदेशी, संदीप भोई, संदीप सांगोरे, जितेंद्र महाजन, भरतसिंह राजपुरोहित, प्रवीण चौधरी, किशोर चौधरी आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.
Post Views: 362
Previous Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Next Post

 तब्बल ७ वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात..!

Next Post
 तब्बल ७ वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात..!

 तब्बल ७ वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us