लोकप्रवाह, जळगांव दि. २७ जुलै : जिल्ह्यातील वाढत्या मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच पाहिजे/फरार आरोपी शोध कामी पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यांतील अज्ञात आरोपी निष्पन्न करण्याबाबत मार्गदर्शन सूचना निर्गमीत केल्या होत्या.
त्याप्रमाणे किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार पोहेकॉ. २७०७ संदिप रमेश पाटील, पोना. २३०६ प्रविण जनार्दन मांडोळे, पोना. नंदलाल पाटील व पोना. भगवान पाटील चालक पोहेकॉ/ विजय चौधरी अशांचे पथक तयार करुन त्यांना मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी मार्गदर्शन केले. पारोळा शहरातील मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यामधील पाहीजे असलेला आरोपी नामे योगेश शिवाजी दाभाडे रा. बळसाणे ता.साक्री जि.धुळे याचे संदर्भात गोपनिय माहिती काढून नमूद पथकाने सदर आरोपीस धुळे शहरातून दि. २७.०७.२०२२ रोजी ताब्यात घेवून त्यास विचारपूस करता त्याने दि. २३.०५.२०२२ रोजी पारोळा शहरातून स्टेट बँकेच्या जवळून प्लॅटीना मोटरसायकल चोरुन नेली होती त्याबाबत पारोळा पोस्टे. येथे भाग-५ गुरनं. १६०/२०२२ भादंवि.क.३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
तसेच नमूद आरोपीविरुध्द यापुर्वी पारोळा पोस्टे. येथे भाग-५ गुरनं.९५ / २०२१ भादंवि.क.३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदरचा गुन्हा घडल्यापासून तो फरार होता. नमूद आरोपीविरुध्द भोसरी जि.पुणे येथे भारतीय हत्यार कायदा क. ३ / २५ अन्वये गुन्हा दाखल आहे. तसेच सदर आरोपीवर जळगांव शहर तसेच जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर व धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका, धुळे शहर, आझाद नगर, देवपूर पोलीस स्टेशन व नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांव बसवंत, गंगापूर, सरकारवाडा पोलीस ठाण्यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. नमूद आरोपीस यापुर्वी सुध्दा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. सदरवेळी त्याचेकडून २७ चोरीच्या मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.