लोकप्रवाह, चाळीसगांव दि. २८ जुलै – तालुक्यात तसेच आजुबाजुच्या परिसरात होणा-या गुरे चोरीच्या तपासाच्या अनुषगांने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी वेगवेगळे पथक नेमुन सिल्लोड, औरंगाबाद येथून आरोपींना ताब्यात घेत अटक करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 13 /07/ 2022 रोजी फिर्यादी नामे ममराज भाईदास जाधव, वय 30 धंदा शेती रा. सोनगाव पो.खेर्डे ता. चाळीसगांव यांनी त्याचे मालकीचे एकुण 1,60,000/- किमंतीचे गुरे सोनगांव पोष्ट खेर्डे ता.चाळीसगांव शेतातील पत्री शेड जवळुन गुरे चोरी केले बाबत चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. 388/2022 भादंवि कलम 379,34 प्रमाणे दाखल करण्यात येवुन सदर गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे आदेशान्वये पोहेकॉ/287 नितीन श्रीराम सोनवणे यांचे कडेस देण्यात आला होता. चाळीसगांव तालुक्यात तसेच आजुबाजुच्या परिसरात होणा-या गुरे चोरी अनुषगांने पोलीस निरीक्षक संजय ठेगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे वेगवेगळे पथक नेमण्यात येवुन त्या पैकी पोना/2574 नितीन आमोदक, पोना/991 गोवर्धन बोरसे, पोना / 172 संदिप पाटील यांच्या पथकाला सदर जनावरे चोरी करणारे हे सिल्लोड जि. औरगांबाद येथील असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने त्यांची माहीती काढुन 1) शेख इम्रान शेख ईसा, वय 30, 2) शेख ईब्राहीम उर्फ मौल्या शेख उस्मान, वय 26, 3) शेख उमेर शेख ताहीर, वय 27, 4) सर्फराज बिलाल खाटीक, वय 22, 5) शेख सत्तार शेख ईसा, वय 24, 6) शेख इरफान शेख ईसा, वय 33 सर्व रा.आबदलशा नगर, इदगाह, सिल्लोड, जि. औरगाबांद यांना अटक करण्यात आली. पोलीस रिमांडमध्ये आरोपींची चौकशी करता चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एकुण 6 गुन्हे ज्यामध्ये खेर्डे येथुन 6, वाघळी शिवार येथुन 4, वडाळी वडाळी व न्हावे येथुन 3, जावळे येथुन 2 रोकडे फाटा येथुन 2 तसेच पिपंळवाड निकुंभ येथुन 3 जनावरे अशी एकुण 20 जनावरे चोरी करुन नेल्याचे उघडकीस आले.
गुरे चोरीच्या गुन्ह्यात दिनांक 22/7/2022 रोजी तपास पथक पोना नितीन आमोदकर, पोना गोवर्धन बोरसे, पोना संदीप पाटील असे खाजगी वाहनाणे सिल्लोड येथे जातं असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. वाहन पूर्णपणे क्षतीग्रस्त होवून सुदैवाने ते वाचले, त्यांना मुका मार लागला.. तरी सुद्धा त्यांनी सिल्लोड येथे जाऊन गुरे चोरीतील आरोपींना शितफिने पकडून आणले. सदर आरोपी पकडण्यात महिला पोलीस नाईक मालती बच्छाव यांची मोलाची कामगिरी आहे.
यावेळी आरोपींकडुन 8000/- रुपये रोख व गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिद्रा पिकअप गाडी किंमत रु. ५ लाख असे जप्त करण्यात आले. त्यानंतर आरोपींकडेस अधिक चौकशी केली असता पोलीस स्टेशन हद्दीबाहेरील नागद, पिलखोड, हनुमंतखेडा व परिसरातील गुरे चोरी केल्याचे सांगत असुन आरोपी हे गुरे चोरी केल्या नंतर सदर गुरांची विल्हेवाट सिल्लोड व मालेगाव येथे लावत असल्याचे सांगितले. चौकशी दरम्यान अजुन बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून मुख्य सुत्रधारास लवकरच अटक करण्यात येईल असे समजते.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेगें, सपोनि. रमेश चव्हाण, पोउपनि. लोकेश पवार, स.फौ. राजेद्र सांळुखे, अविनाश पाटील, पोहेकॉ.2650 युवराज नाईक, पोहेकॉ.287 नितीन श्रीराम सोनवणे, पोहेकॉ.1370 दत्तात्रय महाजन, पोहेकॉ. 3188 कैलास पाटील, पोहेकॉ.2781 दिपक ठाकुर, पोना. 2574 नितीन किसन आमोदकर, पोना. 2865 शांताराम सिताराम पवार, पोना. 991 गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना. 172 संदिप ईश्वर पाटील, पोना. 2841 भुपेश वंजारी, पोना.संदिप माने, पोना.2895 ज्ञानेश्वर काशिनाथ बडगुजर, पोना. 2885 देविदास संतोष पाटील, पोना. 334 दिनेश विक्रम पाटील, पोना. 1810 प्रेमसिंग नरसिंग राठोड, पोना. विजय पाटील, पोना. संदिप पाटील, पोकॉ. 2033 हिराजी देशमुख, पोना. नंदकुमार जगताप, मपोना. 3054 मालती बच्छाव, व चालक सफौ. अनिल आगोणे, पोना. 616 मनोहर पाटील आदिंच्या पथकाने केलेली आहे.