जलसंवर्धनाकरीता रोटरी क्लब एक पाऊल पुढे; आडगांव येथील नाला खोलीकरणासाठी 31 हजाराची मदत..!
चोपडा – येथील रोटरी क्लब आॕफ चोपडा व आडगांव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने नरवाडे रस्त्यालगत सुमारे अर्धा किलोमीटर लांबीच्या नाला खोलीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील विहिरी व ट्युबवेल मधील पाण्याची पातळी वाढण्यास निश्चितच मदत होईल. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे.
पुर्वी सुजलाम – सुफलाम असणाऱ्या आडगांव या गावांला मागील काही वर्षापासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे भविष्यात आणखी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेत नरवाडे रस्त्यावरील नाला खोलीकरणास सुरुवात करण्यात आली. त्यांच्या या अभिनव समाजकार्यास मदत व्हावी म्हणून रोटरी क्लब आॕफ चोपडाच्या वतीने पुढाकार घेत रु. ३१ हजाराची मदत करण्यात आली.
यावेळी प्रोजेक्ट चेअरमन रोटे. व्हि.एस.पाटील, रोटरी क्लब आॕफ चोपडा अध्यक्ष रोटे. पंकज बोरोले, मानद सचिव रोटे. प्रविण मिस्त्री, एनक्लेव चेअर रोटे. एम.डब्ल्यु. पाटील, रोटे. प्रसन्न गुजराथी, पृथ्वीराज राजपूत, महेंद्र बोरसे, अर्पित अग्रवाल, चेतन टाटीया, भालचंद्र पवार तसेच आडगांव येथील प्रगतीशील शेतकरी अंबादास पाटील, शामकांत पाटील, शिवाजी पाटील, सरपंच रावसाहेब पाटील, डॉ. विजय पाटील आदिंसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.