लोकप्रवाह, चोपडा दि. ०७ आॕगस्ट – देशात दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाच्या माध्यमातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांच्या आदेशानुसार दि. ६ ऑगस्ट रोजी ४ वाजता शासकीय विश्रामगृहावर भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक तालुकाध्यक्ष पंकज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी चोपडा तालुक्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी गावागावात जनतेने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ आजी, माजी सैनिक व दिव्यांगांना गौरविण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या बैठकीत तिरंगा यात्रा काढणे व हर घर तिरंगा या विषयावर चर्चा झाली. दि. ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिन बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करणे, मोटरसायकल रॅली काढून अमृत महोत्सव साजरा करणे, ११ ते १३ ऑगस्ट पर्यंत तालुक्यातील प्रत्येक गावात रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सिताराम या सुरात प्रभात फेरी काढणे, १३ ऑगस्ट पासुन १५ ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा अभियानात प्रत्येक घरावर झेंडा लावणे, ११ ऑगस्ट ते १३ ऑगस्टपर्यंत महापुरूषांच्या स्मारकांची साफसफाई करून माल्यार्पण करणे, ७५ आजी, माजी सैनिक व ७५ दिव्यांग बांधवांचा सम्मान व सत्कार करणे आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिमाखात साजरा करावा असे आवाहन भाजपाचे तालुका अध्यक्ष पंकज पाटील व शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल यांनी यावेळी बोलतांना केले.
![](http://lokprawah.com/wp-content/uploads/2022/08/20220807_135343.jpg)
बैठकीला पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम म्हाळके, जेष्ठनेते चंद्रशेखर पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रदीप पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल, माजी जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे, अॕड. एस. डी. सोनवणे, युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस रावसाहेब पाटील, युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मनोज सनेर, सरचिटणीस हनुमंत महाजन, हेमंत जोहरी, मनोहर बडगुजर, जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष संजय जैन, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील, बाजार समिती संचालक धनंजय पाटील, शेतकी संघाचे संचालक हिंमतराव पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस अमित तडवी, तालुका चिटणीस भरत सोनगिरे, बुथ संयोजक विजय बाविस्कर, युवा मोर्चा उपाध्यक्ष रणछोड पाटील, विवेक गुजर, विजय पाटील, आकाश नेवे, धर्मदास पाटील, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विशाल भोई, प्रेम घोगरे, तुषार पाठक, योगराज जाधव, दीपक बाविस्कर, एकनाथ पाटील. डॉ. सुधाकर पाटील, कैलास पाटील, रवींद्र पाटील, जितेंद्र चौधरी, राजेंद्र खैरनार, गुलसिंग पावरा, सचिन निकाळजे, फरीद तडवी, लक्ष्मण पाटील, योगेश महाजन, भूषण महाजन, धीरज सुराणा, प्रताप पावरा, विकास पाटील, मिलिंद वाणी, हेमंत देवरे, मोहित भावे, गजानन पाटील, सागर पाटील, मंगल पाटील, शरद पाटील, सलीम तडवी, योगेश्वर पाटील, दीपक चौधरी, गजानन राजू पाटील यांचेसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
![](http://lokprawah.com/wp-content/uploads/2022/07/88-scaled.jpg)
Post Views: 362