लोकप्रवाह, चोपडा दि. ११ जून – येथील आर्टस, सायंस अँड काॕमर्स कॉलेजचा विद्यार्थी प्रसाद अनंत चौधरी हा बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून प्रथम आला. त्याला ९१.१७ टक्के गुण मिळाले. त्याच्या या यशाबद्दल जळगांव व चोपडा तेली समाजातर्फे एका कार्यक्रमात प्रसादचा सत्कार करण्यात आला.
तो उपप्राचार्य प्रा. डॉ. अनंत लालचंद चौधरी व रत्नाबाई अनंत चौधरी यांचा पुत्र आहे. त्याच्या यशाबद्दल चोपडा तेली समाजाने आनंद व्यक्त केला. जिल्हा तेली समाजाच्या वतीने प्रदेश तेली महासंघाचे अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष के. डी. चौधरी, चोपडा तेली समाजाचे उपाध्यक्ष टी. एम. चौधरी, विश्वस्त नारायण पंडीत चौधरी, राजेंद्र गणपत चौधरी, देवकांत चौधरी, प्रदेश तेली महासंघ चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी यांनी प्रसाद याचा सत्कार केला. टी. एम. चौधरी व के. डी. चौधरी यांनी प्रसादचा गुणगौरव करुन त्याच्या आई-वडिलांचा आणि परिवाराचा सत्कार केला.