गोरगांवले बु. परिसरातील केळी बागांचे वादळी पावसामुळे नुकसान; तातडीने शासकीय मदत मिळावी ग्रामस्थांची मागणी
लोकप्रवाह, चोपडा दि. ११ जून – तालुक्यात दि. ९ रोजी रात्री वादळी वार्यासहित आलेल्या मुसळधार पावसामुळे गोरगांवले बु. परिसरातील गोरगांवले बु., वडगांव सिम, धनवाडी, कोळंबा, कठोरा, खडगांव, गोरगांवले खु., वडगांव खु., खेडी, भोकरी, सनपुले व घुमावल बु. या शिवारातील जवळपास ७०० शेतकऱ्यांचे ४७१ हेक्टरवरील केळी बागांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अशी माहिती प्रत्यक्ष पाहणी केल्यावर तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंके यांनी दिली.
याप्रसंगी कृषी सहाय्यक कैलास देशपांडे, तलाठी व्हि.पी.पाटील, पोलीस पाटील विनोद पाटील, दत्तात्रय पाटील, सदानंद पाटील, कोतवाल चंद्रकांत सरदार यांचेसह नुकसानग्रस्त शेतकरी यांचीही उपस्थिती होती.
कटाईवर आलेल्या केळी बागांचे अस्मानी संकटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. याबाबत शासनाने तात्काळ पंचनामे करुन मदत द्यावी – जगन्नाथ बाविस्कर, माजी सरपंच, गोरगांवले बु., चोपडा