Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अवैध लाकूडांचे चार ट्रक पकडण्यात पोलीसांना यश; चाळीसगांव ग्रामीण पोलीसांची दमदार कारवाई..!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 11, 2022
in क्राईम
0
अवैध लाकूडांचे चार ट्रक पकडण्यात पोलीसांना यश; चाळीसगांव ग्रामीण पोलीसांची दमदार कारवाई..!

अवैध लाकूडांचे चार ट्रक पकडण्यात पोलीसांना यश; चाळीसगांव ग्रामीण पोलीसांची दमदार कारवाई..!

अवैध लाकुड वाहतूक करणाऱ्या जप्त वाहनांसोबत पोलीस निरिक्षक संजय ठेंगे व पथकातील पोलीस कर्मचारी

लोकप्रवाह, चाळीसगांव दि. ११ जून – मिळालेल्या गुप्त माहितीनुसार व पोलीस अधिक्षक यांच्या आदेशाने सुरु असलेल्या आॕल आऊट मोहिमे दरम्यान तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या पथकांना नाकाबंदी दरम्यान मालेगांव रोड, वाघळी रोड व धुळे रोड आदि ठिकाणी अवैध लाकुड वाहतुक करणारे चार ट्रक पकडण्यात चाळीसगांव ग्रामीण पोलीसांना यश आले. पुढील कारवाईकरीता सदर जप्त केलेली वाहने लाकुडांसह वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली.

https://lokprawah.com/wp-content/uploads/2022/06/VID-20220611-WA0339.mp4

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संजय ठेंगे यांना गुप्त माहिती मिळाली की, चार ट्रकांमधून चंदन लाकुडाची वाहतूक होणार आहे. म्हणून त्यांनी वेगवेगळी पथके हि वाघळी रोड, मालेगांव रोड व धुळे रोड या ठिकाणी पाठविली. व सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या दरम्यान वाघळी रोड बोरखेडा जवळ MH-18, M – 6778 व MH-18, BG-2918 या ट्रकांची पाहणी केली असता त्यामध्ये अवैध निंब व बाभळीचे लाकुड असल्याचे निदर्शनास आले. तसेच धुळे रोड बायपास येथे नाकाबंदी दरम्यान MH-04 S-3288 व मालेगांव रोड येथील पथकास MH-19, K-8274 या ट्रकांमध्ये सुद्धा अवैध लाकुड वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आले. चालकांची नांवे इमरान खाँ जब्बार खान व मुतालिब खाँ लियाकत खान दोघेही रा.मालेगांव तसेच नईम शेख कयुम शेख रा. उंबरखेडे, चाळीसगांव व सद्दाम सैयद हसन अशी आहेत. तर वाहन मालकांची नांवे मजहर खान, अलीम खान व कादीर सैय्यद सर्व रा. मालेगांव अशी आहेत.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संंजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. रमेश चव्हाण, सपोनि. डि.व्हि. सुंदरडे, पोहेकाॕ. युवराज नाईक, पोना. गोवर्धन बोरसे, शांताराम पवार, संदीप पाटील, नितीन आमोदकर, ज्ञानेश्वर बडगुजर, देविदास पाटील, नंदू परदेशी, संतोष शिंदे, पोना. चालक मनोहर पाटील आदिंनी केली.

Post Views: 282
Previous Post

गोरगांवले बु. परिसरातील केळी बागांचे वादळी पावसामुळे नुकसान; तातडीने शासकीय मदत मिळावी ग्रामस्थांची मागणी

Next Post

ढिसाळ नियोजनामुळे शहरवासीय करताय पाणीटंचाईचा सामना; नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाचा ढिम्म कारभार 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us