लोकप्रवाह, चोपडा दि. २३ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व शिव शंकर जेष्ठ नागरिक संघ, हातेड यांच्या संयुक्त विद्यमाने हातेड बुद्रुक येथे राजर्षी शाहू छत्रपती बहुउद्देशीय सभागृहात जेष्ठांची आरोग्य व कायदे विषयक कार्यशाळा पार पडली. अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते. उद्घाटन विद्यापीठाचे विभागाचे संचालक प्रा.डॉ. आशुतोष पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. फेस्कॉमचे माजी अध्यक्ष डी.टी.चौधरी, प्रादेशिक विभाग अध्यक्ष जगतराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष छन्नू झेंडू पाटील, चोसाका माजी चेअरमन अॕड. घनश्याम पाटील व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. विकास हरताळकर, डॉ. नरेंद्र शिरसाठ, डी.टी.चौधरी, बी.एन.पाटील, प्रा.अशोक पवार, अॕड. शशिकांत पाटील, अॕड. सुरेश सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून उतारवयात जीवन जगण्याचा मूलमंत्र सांगितला. माजी शिक्षक आमदार प्रा.दिलीप सोनवणे यांनी प्रस्ताविकातून जेष्ठ नागरिक संघाचा परिचय करुन दिला. प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी आनंदी जीवनाची सूत्रे यावेळी मनोगतातून सांगीतली. यावेळी जेष्ठांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. यावेळी विविध ठिकाणच्या संघाचे व संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व नागरिक यांची उपस्थिती होती.