Friday, September 11, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

जळगांवचे पालकमंत्री पुन्हा एकदा गुलाबराव पाटील!!; पहा राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची यादी…

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 24, 2022
in ब्रेकींग न्युज, राजकीय
0
जळगांवचे पालकमंत्री पुन्हा एकदा गुलाबराव पाटील!!; पहा राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची यादी…

लोकप्रवाह, मुंबई, 24 सप्टेंबर : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकार पालकमंत्र्यांची यादी जाहीर कधी करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ भाजप नेते गिरीश महाजन यांना धुळे, लातूर व नांदेड या तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळातील विस्तारात भाजपच्या वाटेला महत्त्वाची खाती आली होती. गृह आणि अर्थ खातं भाजपने घेतलं होतं. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ही खाती ठेवली होती. याशिवाय गृहनिर्माण, ऊर्जा, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास ही सर्व महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं हे महत्त्वाचं खातं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पालकमंत्र्यांच्या यादीतही देवेंद्र फडणवीस यांच्याचकडे जास्त जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर,गोंदिया

चंद्रकांत पाटील- पुणे

विजयकुमार गावित – नंदुरबार

गिरीश महाजन – धुळे,लातूर, नांदेड

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे – नाशिक

संजय राठोड – यवतमाळ, वाशिम,

सुरेश खाडे – सांगली,

संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत – रत्नागिरी, रायगड

तानाजी सावंत -परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार – हिंगोली

दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

पालकमंत्र्यांची ही यादी तात्पुरती?

राज्य सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. राज्यात सत्तांतर होवून तीन महिने झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? याकडे अनेकांचं लक्ष आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यातील विस्तार बाकी होताच पण जिल्ह्यानिहाय पालकमंत्र्यांची देखील यादी जाहीर झालेली नव्हती. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर वारंवार टीका केली जात होती.

पालकमंत्री हा जिल्ह्याचा प्रमुख असतो. जिल्ह्यातील सर्व विकासकामांना निधी मंजूर करण्यापासून ते अनेक महत्त्वाच्या कामांसाठी पालकमंत्र्याची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे सरकार स्थापन होवून तीन महिने झाले तरी पालकमंत्री कधी घोषित होतील? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. ही यादी पुढच्या अडीच वर्षांसाठी जशी आहे तशीच राहण्याची शक्यता कमी आहे. कारण दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार जाहीर झाल्यानंतर नव्या मंत्र्यांनादेखील काही जिल्ह्यांची पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याती शक्यता आहे.

Post Views: 412
Previous Post

हातेडला जेष्ठांची आरोग्य व कायदे विषयक कार्यशाळा 

Next Post

चोपड्यात होणार वहनोत्सव व रथोत्सव उत्साहात !! श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा शेकडो वर्षाची संस्कृती जपणारा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us