लोकप्रवाह, चोपडा दि. ३० – येथील उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर राबविण्यात आले. यामध्ये तब्बल ५५ बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्यात आल्या. नेहमीप्रमाणे वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र यावेळी सुद्धा या उपक्रमात आघाडीवर दिसून आले. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, वैजापूर चे ३७, लासुर १५ व उपजिल्हा रुग्णालय ०२ अश्या एकुण 55 बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्यात आल्या. सदर शस्त्रक्रिया स्त्रीरोगतज्ञ डॉ. पवन पाटील, डॉ. गुरुप्रसाद वाघ, डॉ. चंद्रहास पाटील व भुलरोग तज्ञ डॉ. नरेंद्र पाटील यांच्या सहकार्याने नाशिक येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांनी सर्व माता सुरक्षित ठेवून यशस्वीपणे पार पाडल्या.
सदर शिबीर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तुषार देशमुख, माता बाळ संगोपन अधिकारी डॉ. मनिषा बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली व चोपडा उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर प्रा.आ.केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र पवार व इतर वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील व तालुक्यातील आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, आशा स्वयंसेविका, सर्व परिचर आदिंसह इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पडले. यावेळी डॉ.वर्षा लहाडे यांचे आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर व सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केले.