Saturday, September 12, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अनोळखी इसमाच्या मृत्युचे गुढ उकलण्यात चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना यश; दोन आरोपींना केले जेरबद!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 30, 2022
in क्राईम
0
अनोळखी इसमाच्या मृत्युचे गुढ उकलण्यात चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना यश; दोन आरोपींना केले जेरबद!!

लोकप्रवाह चाळीसगांव, दि. ३० –  चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 29/08/2022 रोजी कन्नड घाटात जय मल्हार पॉईंटच्या अलीकडे 100 मीटर खोल दरीत एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत मिळून आले होते. त्याबाबत चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू रजि. नं 49/2022 दाखल करण्यात आला होता. त्याचा तपासात तो खुन असल्याचे निष्पन्न होवून दोन जणांना जेरबंद करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर अनोळखी मयताचा चेहरा पूर्णपणे कुजलेला असल्याने त्याच्या चेहऱ्याचा फोटो काढून तो फोटोग्राफर अनिकेत जाधव याचेकडून डेव्हलप करुन चेहरा थोडा स्पष्ट केला गेला व त्यावरुन तसेच मयताच्या कपड्यांवरुन मयताची ओळख पटविण्यात ग्रामीण पोलीसांना यश आले. ते प्रेत मधूकर रामदास बुटाले वय 45, रा. न्यायनगर, पुंडलीक नगर, औरंगाबाद येथील रहिवासी असल्याचे समजले. त्याचे नातेवाईकांनी त्याचा काहीतरी घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला. मयताच्या मारेकरीचा कोणताही मागमूस नसतांना सुद्धा चाळीसगांव ग्रामीण पोलीसांनी गतीने तपासाची चक्रे फिरविली. व गुप्त माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने दिनांक 30/09/2022 रोजी सदर मयताचे मारेकरी शोधून काढत त्यांना ताब्यात घेण्यात आले. सदर मयताचे मारेकरी हे मयताचा मेहूणा 1 ) गोपाल शंकर पंडीत, वय-32 व त्याचा मित्र 2) कृष्णा रामदास भोसले, वय-25, दोन्ही रा. औरंगाबाद हे आहेत. त्यांना पोलीसांनी चौकशीसाठी बोलविले असता सुरवातीला गोपाल पंडीत याने मयताची मुलगी धुळे येथे दिलेली असल्याने कदाचित तो औरंगाबाद येथून धुळे येथे जाण्यासाठी निघाला असावा व कन्नड घाटात उतरुन दारुच्या नशेत घाटात पडला असावा अशी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोलीसांनी विश्वासात घेऊन पुन्हा विचारपूस केली असता त्यांनी कबूल केले की, दिनांक 27/08/2022 रोजी वरील दोन्ही आरोपी हे मयतासोबत औरंगाबाद रामगिरी हॉटेल येथून गोपाल पंडीत याची रिक्षा क्र. एमएच-20-ईएफ-7984 यामध्ये बसून सावित्रीनगर मार्गे वरुड गावी जात असतांना 5000/- रुपये देण्याच्या वादावरुन कृष्णा भोसले व मयत मधूकर बुटाले यांचे चिखलठाणा पोस्टे. हद्दीत वरुड गावाजवळ रिक्षातच भांडण झाले व त्यातच कृष्णा भोसले याने मयत मधूकर बुटाले याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर दोन्ही आरोपींनी मिळून त्याचे प्रेत रिक्षाने औरंगाबाद येथून कन्नड घाटात जय मल्हार पॉईंटजवळ दरीत फेकून दिले. सद्या दोन्ही आरोपी हे चाळीसगांव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात असून त्यांचेविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुनातील जेरबंद आरोपींसोबत पोलीस निरिक्षक संजय ठेंगे, सपोनि. हर्षा जाधव व इतर पोलीस कर्मचारी

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरिक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षा जाधव, पोहेकाॕ. युवराज नाईक, पोना. शांताराम पवार, सफौ. राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ. नितीन सोनवणे, पोना. शंकर जंजाळे, पोना. संदिप माने, पोना. मनोज पाटील, पोना. प्रेमसिंग राठोड, चालक सफौ. अनिल आगोणे आदिंच्या पथकाने केले.

Post Views: 445
Previous Post

उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीरांतर्गत तब्बल ५५ शस्त्रक्रिया संपन्न; वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र आघाडीवर!!

Next Post

वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान उत्साहात

Next Post
वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान उत्साहात

वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" अभियान उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us