लोकप्रवाह, चोपडा दि. ०५ नोव्हें. ( संदिप ओली): येथील सर्वसामान्यांसाठी झटणारे व्यक्तिमत्व, भुमिपूत्र डॉ. चंद्रकांत बारेला यांनी तालुक्यातील निकृष्ट रस्ते बांधकाम व खड्डेमय रस्ते या विषयांवर सार्वजनिक बांधकाम विभागाला चांगलेच धारेवर धरल्याचे दिसत आहे. खड्डेमय रस्ते खड्डेमुक्त व्हावेत याकरीता डॉ. चंद्रकांत बारेला हे सतत पाठपुरावा करीत आहेत. खड्डयांसोबत सेल्फी काढणे ते खड्डयांभोवती चूना मारुन रिंगण करणे असे अनोख्या प्रकारची आंदोलने त्यांनी त्यांच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने याअगोदर केली आहेत. मात्र तरीसुद्धा कुंभकर्णी झोपेच सोंग घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागास जाग येत नाही असे निदर्शनास येताच त्यांनी रस्ता रोको करण्याचा निर्धार केला. व त्या अनुषंगाने आज दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान अकुलखेडा गावाजवळील पूलावर शेकडो समर्थक व सर्वसामान्य नागरिकांसह रस्ता रोको करण्यात आला. यामुळे सुमारे अर्धा एक तास दोन्ही कडील वाहतुक ठप्प झाली होती. अवजड वाहनांसह, दुचाकी व चारचाकींच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
यावेळी आंदोलनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विरेंद्र राजपूत यांना यासंबंधी निवेदन देण्यात आले. व लवकरात लवकर तालुक्यातील सर्व रस्ते हे खड्डेमुक्त करा अन्यथा भविष्यात आंदोलन तीव्र करण्यात येईल तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासंबंधी न्यायालयात लवकरच जनहित याचिका दाखल करणार असल्याचे डॉ. चंद्रकांत बारेला यांनी यावेळी बोलतांना सांगितले. सदर रस्ता रोको आंदोलनाप्रसंगी डॉ. चंद्रकांत बारेला मित्रमंडळाचे अमोल राजपूत, निलेश जाधव, शाम जाधव, सचिन डाभे, सुरेश सुर्यवंशी, ईश्वर भिल, दिपक वानखेडे, सचिन पाटील, विकास निकम, बापू मोरे, अकुलखेडा गावचे उपसरपंच योगेश दगडू पाटील, ग्रामपंचायत सदस्य वसंत मोरे, अनंत महाजन, नितीन महाजन, अल्केश माळी, विष्णापूरचे समाधान माळी, महेंद्र सपकाळे, जीवन लोहार यांच्यासह इतर नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोउनि. घनश्याम तांबे, पोहेकाँ. जितेंद्र सोनवणे, नाना पाटील, पोकाँ. प्रकाश मथूरे आदिंसह इतरांनी चोख बंदोबस्त ठेवला.
Post Views: 355