लोकप्रवाह, चोपडा दि. १८ फेब्रु. (संदिप ओली) : येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, ओम शांती केंद्रामध्ये महाशिवरात्री निमित्त शिवध्वज पूजन यांसह विविध अध्यात्मिक कार्यक्रमाने महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले (IPS) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच शिवध्वज पूजन माजी आमदार तथा तापी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी साबूदाणा पासून विशेष तयार करण्यात आलेल्या शिवलिंगाचे पूजन व आरती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ओम शांती केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारीज मंगलादीदी यांनी शिवरात्रीचे महत्त्व सांगताना सांगितले की, शिव परमात्मा यांचे या धरतीवर दिव्य अवतरण झाले आहे. कलयुगाच्या अज्ञान अंधकाराच्या रात्रीमध्ये येऊन ज्ञानाचा प्रकाश शिव परमात्मा देत आहेत. याची आठवण म्हणून शिवरात्री साजरी केली जाते. यादिवशी आपण जास्तीत जास्त ईश्वरचिंतन केले पाहिजे, असे त्यांनी बोलतांना सांगितले. शिवलिंगावर जी त्रिपिंडी आहे त्याचे अध्यात्मिक रहस्य म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि शंकर या त्रिदेवतांचे शिव परमात्मा रचयिता आहेत म्हणून शिवलिंगावर त्रिपिंडी दाखवली जाते म्हणून भगवान शिवशंंकराला त्रिमूर्ती शिव असेही म्हटले जाते. शिवलिंग, राधा कृष्ण असे विविध देखावे तयार करण्यात आले होते. भक्तांनी भगवान शिवचे दर्शन घेण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओम शांती केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारीज मंगलादीदी, राज दीदी, ब्रह्माकुमारी सारिकादीदी, कांचन भोळे, राजेंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले.
Post Views: 258