Thursday, September 10, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 20 फेब्रुवारीच्या बेमुदत संपाची जोरदार तयारी सुरू !!

महाराष्ट्र राज्य आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड अमृत महाजन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
February 18, 2023
in ब्रेकींग न्युज, महाराष्ट्र
0
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 20 फेब्रुवारीच्या बेमुदत संपाची जोरदार तयारी सुरू !!
लोकप्रवाह, चोपडा दि. १८ फेब्रु. (संदिप ओली): महाराष्ट्रात येत्या सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी पासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी  कर्मचारी संघटना कृती समिती तर्फे राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातही संपाची जोरदार तयारी सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अमृत महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
                       यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, संबंधित खात्याचे आयुक्त व सचिव यांच्याशी चर्चा सुरू आहे मात्र प्रत्येकवेळी केवळ आश्वासन मिळाले.  मानधन वाढ व इतर काही मागण्यांवर सरकार सकारात्मक असून दिलासादायक निर्णय घेऊ, अशी आश्वासने देण्यात आली. त्यासाठी अनेक मुदतीही दिल्या गेल्या मात्र आश्वासने पोकळ निघालीत. अंगणवाडीच्या मोबाईलची वॉरंटी गॅरंटी संपलेली असून अंगणवाडी सेविका स्वतःचे मोबाईल वापरत आहेत. दुरस्तीसाठी हजारो रुपये पदरमोड करुन खर्च केले तेही दिले नाहीत. मोबाईल वापसी मोहीम देखील चालू आहे, परंतु तो मोबाईल काही बदलून दिलेला नाही. ५ वर्षापासून मानधन वाढ नाहीं. ४ ते ५ वर्षापासून सेवानिवृत्त झालेल्या सेविका व मदतनीस यांना अनुक्रमे १ लाख व ७५००० रुपये सेवानिवृत्ती लाभ दिलेला नाही. अंगणवाडी सेविकांच्या भरपूर जागा रिक्त आहेत, विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्या जागा सुद्धा रिक्त आहेत. अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारीच्या दर्जा दिला जात नाही. त्याचप्रमाणे मोबाईल हाताळणी प्रोत्साहन भत्ता कमी असून, सर्वांवर कामाचा ताण वाढत आहे. अशा काही प्रमुख मागण्यांवर वेळोवेळी चर्चा करूनही निर्णय न झाल्याने नाईलाजास्तव कृती समितीला संपाचा निर्णय घ्यावा लागला असे काॕ. महाजन यांनी म्हटले आहे.
या संप काळात अंगणवाडीचे सर्व कामकाज बंद राहणार असून, खाऊवाटप अहवाल देणे, आरोग्य खात्यापासून सर्वांना माहिती देणे, हे सर्व बंद राहणार आहे. सरकार जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत निर्णय घेत नाही. तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीने केला आहे. जळगाव जिल्ह्यात अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी युनियन ही कृती समितीची मुख्य संघटना असून आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण आदिवासी, नागरी प्रकल्प, मिनी अंगणवाडी व केंद्रे यामधील आयटक नेतृत्वाखालील ३००० सेविका व मदतनीस या बेमुदत संपात सहभागी होणार आहेत. त्या दृष्टिकोनातून संपाची जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार तयारी सुरु आहे. असे कॉ. अमृत महाजन यांनी कळविले.
याकरीता काॕ. अमृत महाजन यांचेसह काॕ. ममता महाजन, वत्सला पाटील, निलीमा पाटील, पुष्पा राजपूत, चंद्रकला चिंचोरे, प्रेमलता पाटील, सुमित्रा बोरसे, नंदा वाणी, भारती पाटील, सूनंदा पाटील, सिमा बागड, लता पाटील, सूलेखा पाटील, रंजना पाटील, चित्रा वारे, अश्विनी देशमुख, सूलक्षणा पाटील, मिना काटोले, उषा पाटील, पुष्पा मोरे, अंजना माळी, मंगला माळी, संगीता पाटील, ज्योती पाटिल, प्रतिभा पाटील, नुरूनीसा हिफाजत अली, फातेमा बी, लक्ष्मी वानखेडे, उषा भालेराव, वंदना कंखरे, रिता तायडे,  रेखा अहिरे, रंजना मराठे, अशहर खान, छाया चित्ते, राधा पाटील, मिना तडवी, गूफ्त्यार तडवी, कवीता वारे, सूनंदा तायडे, विमल नेहते (वरणगाव) रोहिणी सूरवाडे (किन्ही), हिराबाई पाटील आदिंसह शेकडो भगीनी अथक परिश्रम घेत आहेत असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Post Views: 627
Previous Post

चोपडा ओम शांती केंद्रात महाशिवरात्री उत्साहपूर्ण वातावरणात साजरी !!

Next Post

लासुर येथील चार विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे टॅबचे वितरण!

Next Post
लासुर येथील चार विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे टॅबचे वितरण!

लासुर येथील चार विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे टॅबचे वितरण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us