टिम लोकप्रवाह, वर्धा दि. ०९ जून – येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल सुरकार यांची विदर्भ तेली समाज महासंघ युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती महासंघाचे केंद्रिय अध्यक्ष रघुनाथजी शेंडे यांच्या सुचनेनुसार करण्यात आली आहे.
वर्धा जिल्हयातील संपूर्ण तालुक्यात मजबूत संघटन बांधणी करणे व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणे याकरीता सदर निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्तीबद्दल राहुल सुरकार यांनी विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष रघुनाथ शेंडे, सरचिटणीस प्रा. डॉ. नामदेव हटवार, मुख्य संघटक प्रा. रमेश पिसे व संघटक कृष्णा बेले आदिंसह संघटनेच्या सर्व जेष्ठ पदाधिकारी यांचे आभार मानले. व समाजोपयोगी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.