टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०२ डिसेंबर – तालुक्यातील चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आडगाव या गावातून कत्तलीच्या उद्देशाने ३ बैल पायी हाकीत नेत असताना गोरक्षकांनी त्यांना थांबवत शहर पोलीसांना कळवले असता त्याठिकाणी जावून शहर पोलीसांनी कारवाई करीत आरोपींना ताब्यात घेतले. या केलेल्या कारवाईचा राग आल्याने शेकडोंचा जमाव हा रात्री शहर पोलीस स्टेशनला धावून आला. व पोलीसांनी कारवाई करु नये, याकरीता अवैध गर्दी गोळा करुन दबाव निर्माण करणे व धमक्या देणे हा प्रकार पोलीस स्टेशनच्या खालील चौकात सुरु होता. त्याठिकाणी सुद्धा हा जमाव पोलीसांचे काहीच ऐकुन न घेता उलट गोंधळ घालीत होता त्यामुळे शेवटी पोलीसी खाक्या दाखवत सदर जमावाला पळवून लावले.
मात्र तरीसुद्धा शेकडोचा जमाव हा यावल नाक्याजवळील सानेगुरुजी वसाहत या परिसराजवळ जमा होत आहे, अशी सुचना मिळताच सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित सावळे व हवालदार संतोष पारधी हे दोघे दुचाकीने ताबडतोब त्याठिकाणी पोहोचले. व सदर जमावास हटकले असता उलट त्यांनीच सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित सावळे व हवालदार संतोष पारधी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने धक्काबुकी करत कॉलर पकडून लोखंडी फायटरने व काठीने मारहाण केली. याची सुचना शहर पोलीस स्टेशनला कळताच स्वतः पोलीस निरिक्षक व इतर सर्व पोलीस कर्मचारी यांनी त्याठिकाणी धाव घेतली त्यामुळे पुढील होणारा अनर्थ टळला. या सर्व घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. व थेट खाकी वर्दीवरच हात टाकल्यामुळे गोतस्कराची मुजोरी किती वाढली आहे, हे यावरुन दिसून येत आहे.
या घटनेतील सर्व आरोपींवर चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस गुरनं. 609/2023 नुसार भादंवि कलम 307, 353, 332, 143, 147, 148, 149, 323, 506, 427, 109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये शेख साजीद शेख सलीम कुरेशी, शेख सऊद शेख सलीम कुरेशी, शेख सलीम उर्फ टेन्शन शेख उमर कुरेशी, झियाऊद्दीन गयासुद्दीन काझी, शेख इब्राहीम शेख हमीद कुरेशी, शेख नाजीम शेख युनुस, शोऐब सलीम कुरेशी, रईस रज्जाक कुरेशी सर्व रा सानेगुरुजी वसाहत चोपडा व इतर 10 ते 15 लोक आदिंचा समावेश आहे. आतापर्यंत ७ आरोपींना अटक करण्यात आली असून बाकी फरार आरोपींचा शोध सुरु असून लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे हे करीत आहे.
पोलीस हे समाजात रक्षकाच्या भुमिकेत असतात आणि आज त्यांच्यावरच जर का अशाप्रकारे जीवघेणा हल्ला होत असेल तर हि मुजोरी, गुंडगिरी जागेवरच ठेचून काढायला हवी, अशी सर्वसामान्य नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारण या घटनेमुळे पोलीसांचे मनोबल खचू शकते व तसे झाल्यास सर्वसामान्यांचे हाल होणार हे मात्र तितकेच खरे!! —लोकप्रवाह
Post Views: 555