Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अमळनेर येथे उपोषणकर्त्यांची भव्य मिरवणुक व सत्कार समारंभ संपन्न..

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 29, 2023
in जळगांळ जिल्हा, सामाजिक
0
अमळनेर येथे उपोषणकर्त्यांची भव्य मिरवणुक व सत्कार समारंभ संपन्न..
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, अमळनेर दिनांक २९ :- तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील आदिवासी कोळी समाज मंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ दिवसांचे अन्नत्याग सत्याग्रह करणारे उपोषणकर्ते जगन्नाथ बाविस्कर (चोपडा), संजय कांडेलकर, नितीन कांडेलकर (मुक्ताईनगर), पुंडलिक सोनवणे (भोकर), पद्माकर कोळी (डोंगरकठोरा), नितीन सपकाळे (अंजाळे), सौ.सुनीता तायडे (रावेर), सौ. पुष्पा कोळी (बुलढाणा), भगवान कोळी (चुंचाळे) यांची संतश्रेष्ठ श्री सखाराम महाराज मंदिर (वाडीचौक) पासून रूबजीनगर (कोळीवाडा) पर्यंत सवाद्य भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी येथील महिलांनी उपोषणकर्त्यांचे औक्षणही केले.

अमळनेर येथील कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मंडळी

प्रारंभी रूबजीनगर येथे आयोजित स्वागत समारंभात मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.चे माजी.सदस्य प्रभाकर सोनवणे(मोहाडी) यांचा सत्कार रामचंद्र सपकाळेसर यांनी केला. मंडळातर्फे उपोषणकर्त्ये व समन्वय समिती सदस्यांचा शाल हार श्रीफळ व म.वाल्मिकींची मुर्ती देऊन यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ज्येष्ठ समाजसेवक गुरु मधुकर कोळी यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांची समायोचित भाषणेही झालीत. व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक प्रल्हाद बाविस्कर, सौ.लक्ष्मीबाई बाविस्कर (माजी नगरसेविका अमळनेर), सौ.प्रमिलाबाई सोनवणे,(माजी नगरसेविका अमळनेर), लखिचंद बाविस्कर, समन्वय समितीचे प्रमुख जितेंद्र सपकाळे, प्रल्हाद सोनवणे, खेमचंद कोळी,गोपाल कोळी,विशाल सपकाळे, संदीप कोळी, समाजसेविका सौ. मंगलाताई सोनवणे यांचेसह श्रीमती.जावित्रीबाई बाविस्कर, सौ.आशाबाई बाविस्कर, भाईदास कोळी, नामदेवराव येळवे, दौलत कोळी, वैभवराज बाविस्कर,लिलाधर ठाकरे, भाऊसाहेब सोनवणे, दिनकर सपकाळे,रणजीत सोनवणे, बापु कोळी, किशोर कोळी, भाऊलाल महाराज यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी तालुका व जिल्हाभरातील शेकडों कोळी समाजबांधवांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोळी समाज मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सूत्रसंचलन युवाप्रेरक सागर सुकदेव कोळी तर आभार प्रदर्शन गुरु मधुकर सोनवणे यांनी केले. शेवटी उपस्थितांसाठी महाप्रसाद भोजन भंडाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली होती.

Post Views: 280
Previous Post

चोपड्यात दि. 28 नोव्हेंबर ला पोहोचणार आयटकची संघर्ष यात्रा;  तयारीसाठी बैठक !!

Next Post

अवैध गो-तस्करांची मुजोरी वाढली; घातला चक्क खाकी वर्दीवर हात!

Next Post
अवैध गो-तस्करांची मुजोरी वाढली; घातला चक्क खाकी वर्दीवर हात!

अवैध गो-तस्करांची मुजोरी वाढली; घातला चक्क खाकी वर्दीवर हात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us