टिम लोकप्रवाह, चोपडा (जळगांव) दि. ०३ – तालुक्यातील व जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना येत असलेल्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यात त्या समस्येचे निराकरण करण्यात यावे, याकरीता यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना निवेदन देण्यात आले. मात्र संबंधित समस्यांचे सोडविण्यात न आल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे सदर निवेदनात सांगण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा महासचिव अॕड. दारासिंग पावरा, जळगाव ग्रामीण युवा अध्यक्ष नामा पावरा, जयस जळगाव जिल्हाध्यक्ष राहुल बारेला, सदस्य श्रीकांत बारेला, राज बारेला, विजय बारेला आदींची उपस्थिती होती.
जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश तात्काळ देण्यात यावा, डीबीटी निर्वाह भत्ता ड्रेस कोड रक्कम तात्काळ देण्यात यावी, शासकीय आदिवासी आश्रमशाळा मधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तात्काळ वाटप करण्यात यावे, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, भगिनी मंडळ नर्सिंग कॉलेज, डॉ. सुरेश जी. पाटील नर्सिंग कॉलेज चोपडा या कॉलेजचे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी, पंडित दीनदयाळ संयम योजनेची डीबीटी सह रक्कम देण्यात यावी, मागील वर्षी बाकी असलेले विद्यार्थ्यांचीही डीबीटी रक्कम त्वरित देण्यात यावी, नामांकित इंग्रजी माध्यम शाळेतील पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा, अमळनेर तालुक्यातील दहिवद शासकीय अमळनेर शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापक यांना तात्काळ बदली करून सखोल चौकशी करण्यात यावी, शासकीय आदिवासी मुलीचे वस्तीगृह चोपडा येथील विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारत देण्यात यावी व शासनाच्या आदेशानुसार सोयी सुविधा पुरविण्यात यावे, गृहपाल खंबाईत यांची वारंवार लेखी तक्रार करून सुद्धा त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तालुक्यातील वेले येथील नामांकित इंग्रजी माध्यम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना स्कुलबस मध्ये कोंडून घेऊन जातात, तरी त्यांना स्वतंत्र बस देण्यात यावी, विष्णापूर आश्रमशाळेतील मुख्याध्यापक निवासी थांबत नाही तर त्यांना निवासी थांबविण्यात यावे, शासनाचा जीआर नुसार शासकीय आश्रमशाळेत व अनुदानित आश्रमशाळेत सुविधा पुरविण्यात याव्यात. शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह धनवाडी रोड, चोपडा येथे रिक्त पदी लिपिक देण्यात यावे. शिष्यवृत्ती विभागातील कर्मचारी माधवी पाटील यांना गडचिरोली या जिल्ह्यात बदली करण्यात यावी, नामांकित इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळेत आदिवासी व बिगर आदिवासी यांना एकत्रित बसविण्यात यावे व आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात यावी या विविध समस्या संदर्भात प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना निवेदन देण्यात आले.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 07 - केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटने जारी केलेल्या नियमानुसार प्लास्टिक...