टिम लोकप्रवाह, चोपडा दि. २८ – तालुक्यातील घोडगांव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व एस. एन. आर. जी. इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यालयाचा वर्धापन दिनानिमित्त बक्षीस वितरण व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी होते. तसेच रुखणखेडा येथील सरपंच कल्पना पाटील, अक्षय पाटील, विमा अधिकारी महेश जैन, संस्थेचे सचिव जवरीलाल जैन, भानुदास पाटील, रामकृष्ण पाटील, रमाकांत सोनार, घोडगावचे उपसरपंच संतोष कोळी, जयवंत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज रजाळे, रामकृष्ण शिंपी, मुख्याध्यापक आर.पी.चौधरी, प्राचार्या जेनिफर साळुंखे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात चंद्रहासभाई गुजराथी यांनी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात भाग घेऊन शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ करावी, तसेच संस्थेने सुरू केलेल्या इंग्रजी माध्यम शाळेत पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश घेऊन स्पर्धात्मक शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून सुमित चौधरी या विद्यार्थ्याला दहा हजार रुपये मेडिकल खर्चाचा धनादेश प्रदान करण्यात आला. कंपनीकडून विमा अपघात योजनेसाठी वार्षिक पन्नास रुपये शुल्कात लागू केल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या मोबदल्यात आरोग्य सुरक्षा मिळते.
इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. रंगोत्सव सेलिब्रेशन, मुंबई कडून आयोजित राष्ट्रीय रंगभरण स्पर्धेत विद्यालयातील 25 विद्यार्थ्यांची निवड झाली. दहा विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. नाटिका, रिमिक्स नृत्य, देशभक्तीपर नृत्य, रामायणातील प्रसंग, छत्रपती शिवाजी महाराज काळातील प्रसंग, पोवाडा, शेतकरी नाट्य व लोकनृत्य असे विविध संदेशात्मक मनोरंजनमय कार्यक्रमांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. पी. बिर्हाडे, जे. ए. पाठक व सुनंदा एस. बारेला यांनी केले. तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे मार्गदर्शन व्ही. ए. नागपुरे, जेनिफर साळुंखे, कल्पेश साळुंखे, एन. एस. सपकाळे, प्रा. आय. आर. राजपूत, मनीषा पाटील यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद व कर्मचारीवृंदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकवर्गाची उपस्थिती होते.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...