Sunday, December 14, 2025
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

गुलालच्या उधळणीत आणि प्रचंड उत्साहात बाप्पाला निरोप दिला निरोप

तब्ब्ल 71 गणेश मंडळांचा सहभाग

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 12, 2024
in चोपडा, शहर विशेष
0
गुलालच्या उधळणीत आणि प्रचंड उत्साहात बाप्पाला निरोप दिला निरोप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 12 – तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आणि गुलालाची उधळण करीत जोशपूर्ण ढोल ताशांच्या निनादात गणपती विसर्जन शहरात संपन्न झाला. शहरात पाचव्या दिवशी श्रींचे विसर्जन होत असल्याने शहरातील जवळपास ७१ सार्वजनिक गणेश मंडळतर्फे गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावर्षी ५० च्यावर गणेश मंडळ पदाधिकारी यांचेकडून १५ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती असल्याने मिरवणुकीस कसरत करून पार करावी लागली. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त वेळ मिरवणुकीला लागला. विसर्जन मिरवणुकीत मनसे चे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे यांचा गणपती सर्वात प्रथम सकाळी साडेनऊ वाजताच विसर्जन मार्गावरून मार्गस्थ झाला . जवळपास 18 ते 20 तास चालणारी ही मिरवणूक खऱ्या अर्थाने सायंकाळी पाच वाजेपासून सुरू होते. तालुका भरातून ग्रामीण भागातील प्रचंड भाविक भक्त या विसर्जन मिरवणुकीला पाहण्यासाठी आलेले होते. त्यामुळे गर्दीला उधान आलेले होते. शहरातील अरुंद गल्यांमुळे खोळंबा होत असतो. त्यामुळे मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यंत संपू शकत नाही, परंतु यावर्षी शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी यांनी रात्री 12 वाजे पर्यंत मिरवणूक अटोपण्यासाठी प्रयत्न केले नंतर वाजंत्री वाजवली तर गुन्हे दाखल होतील आणि कोणतीही वाजंत्री वाजवता येणार नाही असा इशारा दिला होता. गणपती विसर्जन मिरवणुकीचा मार्ग हा आशा टॉकीज, गोल मंदिर, चावडी, बोहरा गल्ली, मुस्तफा बाबा मशीद, आझाद चौक, पाटील दरवाजा, बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टँड या मार्गे नेहमीप्रमाणे पार पडली. गणपती विसर्जनाची मिरवणूक बोहरा गल्लीमध्ये रेंगाळत रेंगाळत सरकत होती. त्या ठिकाणी गणपती मंडळे लवकर पास होत नसल्याने यावर्षी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी कसब पणाला लावून मंडळ कार्यकर्त्यांना पुढे सरकवत नेले होते.

 

तगडा पोलीस बंदोबस्त
दरम्यान चोपडा शहरातील मिरवणुकीला गालबोट लागू नये म्हणून पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाने चोपडा शहरात चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवलेला होता. चोपडा शहरात छावणीचे स्वरूप या बंदोबस्तानंतर प्राप्त झालेले होते. शहरातील गणपती मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी शहर पोलिसांना शांतता कमिटीचे सर्व सदस्य, सर्वपक्षीय प्रमुख नेते, पत्रकार सर्व पक्षाचे पदाधिकारी, पोलीस पाटील संघटना, पोलीस मित्र , शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांचे सह ग्रामीण पोलीस स्टेशन चे अधिकारी पोलीस कर्मचारी हे मिरवणुकीत सहभागी झाले होते.

गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा सत्कार करतांना काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड. संदिपभैय्या पाटील व इतर

विविध राजकीय पक्ष व इतरांचे शुभेच्छा स्टॉल 

विविध पक्षांचे मंडळ पदाधिकारी यांना शुभेच्छा देणारे स्टॉल्स उभारण्यात आले होते. सर्व पक्षांचे स्वतंत्र असे शुभेच्छा स्टॉल्स लावण्यात आले होते.प्रत्येक मंडळ अध्यक्षांचा गुलाबपुष्प ,श्रीफळ आणि ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला.काँग्रेस,राष्ट्रवादीचे फूट पडलेले दोन्ही गटांचे,शिवसेना पक्षाचे दोन्ही गटांचे ,भाजपाचे आणि नगर पालिकेचे अधिकाऱ्यांमार्फत भ्रमणध्वनी मार्फत शुभेच्छा दिल्या स्टॉल्स लागलेले होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार लता सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील, जगदीश वळवी, प्रा.चंद्रकांत सोनवणे, काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, चोसाला चेअरमन चंद्रहसभाई गुजराथी, भाजपाचे माजी सभापती आत्माराम म्हाळके, हितेंद्र देशमुख, संजय कानडे, नंदकिशोर पाटील, किशोर चौधरी, संजीव सोनवणे, प्रदीप पाटील, नंदकिशोर सांगोरे, राजेंद्र बिटवा आदी उपस्थित होते.

गणेश मंडळ पदाधिकाऱ्याचा सत्कार करतांना चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी

 

नगरपालिकेकडून तापी नदीवर विसर्जनाची व्यवस्था 

शहरासह तालुक्यातील गणपती मूर्तींचे विसर्जन हे गणेश मंडळाकडून तापी नदीवर केले गेले. व ज्या गणेश मुर्त्या या मोठ्या असतील त्यांचे विसर्जन चहार्दी खदानित असणाऱ्या तलावात करण्यात आले. तापी नदीला भरपूर पाणी असल्याने मूर्तीचे विसर्जन करतांना छोट्या मोठ्या मूर्ती नगरपालिकेने ताब्यात घेऊन क्रेनने नदीपात्रात विसर्जन करण्यात आले याकामी नगरपालिका मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली न. प. कर्मचारी आत्माराम बाविस्कर, राजेंद्र सतिश माळी, प्रकाश चव्हाण, भगवान अहिरे, राहुल निकम, प्रवीण सैदाणे, पिंटू संदांशिव, राजू माळी आदींनी याकामी परिश्रम घेतले.

पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर ठाण मांडून..!!
दरम्यान विसर्जन मिरवणुकीला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर,चोपडा उपविभागी पोलीस अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांचे सह वरिष्ठ पोलीस अधिकारी चोपडा शहरात विसर्जन मिरवणूक वेळी ठाण मांडून होते.

 

वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांचे परिश्रम 
दरम्यान यावर्षी 25 ते 30 फुटापर्यंत मुर्त्यांची उंची असल्यामुळे क्षणोक्षणी मुर्त्यांमध्ये विजेचे तार व वायर अडकत होते. त्यामुळे वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता आशिष गायकवाड,अमित सुलक्षणे व इतर कर्मचाऱ्यांनी रात्रभर अथक परिश्रम घेऊन वीज पुरवठा बंद करणे व तात्काळ सुरू करण्यासाठी मेहनत घेतली.

रस्त्यांची साफसफाई करतांना नगरपालिकेचे कर्मचारी

गुलाबी रस्त्यांचे शहर… चोपडा 

उशिरा रात्रीपर्यंत चालेल्या या विसर्जन मिरवणुकीनंतर शहरातील मिरवणूक मार्गांवर अक्षरशः गुलालचा थर साचल्यामुळे संपूर्ण शहराला गुलाबी स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले. या सर्व रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी नगरपालिकेचे आरोग्य व स्वच्छता निरीक्षक व्हि. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतल्याची दिसून आले. 

Post Views: 575
Previous Post

डेंग्यू प्रतिबंधसाठी आरोग्य विभाग व नगरपालिका प्रशासन सज्ज

Next Post

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न चर्चेत लागले मार्गी

Next Post
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न चर्चेत लागले मार्गी

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न चर्चेत लागले मार्गी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

शहरात आदर्श मतदान केंद्र उभारणीसह मतदारांना सुसज्ज सुविधांची हमी व जनजागृती संदेश

शहरात आदर्श मतदान केंद्र उभारणीसह मतदारांना सुसज्ज सुविधांची हमी व जनजागृती संदेश

by टीम लोकप्रवाह
December 3, 2025
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 - शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा...

राष्ट्रीय लोक अदालतीत जवळपास 1 कोटी 5 लाख वसुल; तब्बल 201 प्रकरणे निकाली !!

राष्ट्रीय लोक अदालतीत जवळपास 1 कोटी 5 लाख वसुल; तब्बल 201 प्रकरणे निकाली !!

by टीम लोकप्रवाह
September 13, 2025
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 13 -- मा. उच्च न्यायालय, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये आज...

ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची घुसखोरी थांबवा!!

ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची घुसखोरी थांबवा!!

by टीम लोकप्रवाह
September 9, 2025
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 09 - आंदोलनाच्या झुंडशाहीला बळी पडून शासनाने हैदराबाद गॅझेटिअरबाबत काढलेला शासन निर्णय (जीआर) हा पूर्णपणे असंवैधानिक...

अवैद्य जुगार अड्डयावर पुलगाव पोलिसांची धाड; डीवायएसपी डॉ. वंदना कारखेले यांच्या पथकाची कारवाई 

अवैद्य जुगार अड्डयावर पुलगाव पोलिसांची धाड; डीवायएसपी डॉ. वंदना कारखेले यांच्या पथकाची कारवाई 

by टीम लोकप्रवाह
August 31, 2025
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 30 - जिल्ह्यातील पुलगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी...

नागलवाडी माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेचे पहिले पुष्प संपन्न!!

नागलवाडी माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेचे पहिले पुष्प संपन्न!!

by टीम लोकप्रवाह
August 30, 2025
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 - तालुक्यातील नागलवाडी येथील माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी कथामालेचे पहिले पुष्प गुंफण्यात आले. सर्वप्रथम पू....

डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न 

डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न 

by टीम लोकप्रवाह
August 30, 2025
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 - येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉक्टर सुरेश जी पाटील महाविद्यालयातील पीजी डिपार्टमेंट ऑफ...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us