लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ आॕगस्ट – शहरातील कोणत्याही मार्गावर अवजड वाहनांना बंदी नाही. यावल,धरणगाव व जळगाव साऱ्या बाजूने येण्यास परवानगी आहे. शहरात अरुंद रस्ते असतांनादेखील कोणत्याही वाहनांना प्रवेश बंदी नाही. मात्र फक्त शिरपूर रस्त्याकडून येणारा रस्ता चौपदरी असतांना सुद्धा अवजड वाहनांना बंदी आहे. त्या मार्गाने तालुक्यातील पश्चिम भागातील खेड्यातील हजारो शेतकऱ्यांची मुल शिक्षणासाठी चोपडा येथे येतात. लहान मुलांच्या बऱ्याच शाळा प्रताप विद्यालय, कस्तुरबा विद्यालय व बालमोहन विद्यालय चोपडा – शिरपूर रस्त्यावर असल्याने लहान मुलांना सहज जाता यावे म्हणून त्या शाळेत पालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे. आता प्रशासनाने तो रस्ता बंद केल्याने विद्यार्थांना खूप पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने लहान मुलांचा विचार करून आपला निर्णय बदलून नेहमी प्रमाणे बससेवे साठी मार्ग मोकळा करून द्यावा अशी विनंती शेतकरी कृती समितीचे वतीने समन्वयक एस बी पाटील यांनी प्रशासक व प्रांत सीमा अहिरे व मुख्याधिकारी हेमंत निकम यांना निवेदनाद्वारे केली आहे.प्रशासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल असा आशावाद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसे न झाल्यास स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवाआधी साऱ्या लहान विद्यार्थ्यांना घेवून नगरपालिकेच्या दाराशी विनंती आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे.
श्रमदानातून शाळा रंगविण्याचा नवा उपक्रम संपन्न
रंगविण्यात आलेली शाळा टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 23 - जिल्ह्यातील देवळी तालुकामधील पुलगाव नगरपरिषद येथे इंडिगो...