लोकप्रवाह, एरंडोल दि. ०६ आॕगस्ट – तालुक्यातील आडगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्र व जिल्हा प्रशासन व क्रीडा संचालनालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रामपंचायत, धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा, आडगाव यांच्या सहकार्याने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर पदयात्रा धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय मार्गे जिल्हा परिषद शाळा मार्गे हुतात्मा स्मारक अशाप्रकारे आयोजीत करण्यात आली होती. हुतात्मा स्मारक येथे आल्यावर प्रल्हाद पाटील यांनी हुतात्मा स्मारकाविषयी माहिती सांगितली तसेच स्वच्छतेसंबंधी शपथ घेण्यात आली. यावेळी आडगावचे सरपंच सुनील भिल व ग्रामपंचायत सदस्य, क्रीडा संचालनालयाच्या वतीने एम के पाटील, धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद तसेच नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक मुकेश भालेराव व नेहा पवार आदिंची उपस्थिती होती.