Thursday, June 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव युनिटतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर झेंडा” या उपक्रमासहीत विविध उपक्रमांचे आयोजन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 6, 2022
in जिल्हा
0
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव युनिटतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर झेंडा” या उपक्रमासहीत विविध उपक्रमांचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकप्रवाह, जळगांव दि. ०६ आॕगस्ट – भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष होत पुर्ण असल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव युनिटतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत १३ ऑगष्ट २०२२ ते १५ ऑगष्ट २०२२ या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार “हर घर झेंडा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासोबतच विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील यांनी सांगितले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत १३ ऑगष्ट २०२२ ते १५ ऑगष्ट २०२२ या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार “हर घर झेंडा” हा उपक्रम राबविणे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणाली व भ्रष्टाचाराचे निर्मूलन या विषयावर कार्यशाळा डीएनसी कॉलेज जळगाव येथे घेण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्रि क्रमांक १०६४ व कार्यालयाचा संपर्क क्रमांक व ई – मेल आयडी नमुद असलेले बॅनर हे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव कार्यालयाच्या दर्शनी भागावर व कार्यालयाचे आवारात लावण्यात आले. भ्रष्टाचाराचे निर्मुलन करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी रेल्वेस्टेशन, बसस्टॅण्ड जळगाव सदर ठिकाणच्या उपस्थितांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यप्रणाली, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक १०६४ व जळगाव कार्यालयाचे संपर्क क्रमांक व इ-मेल आयडी नमुद असलेली पत्रके वाटप करण्यात आली. भ्रष्टाचार निर्मूलन प्रसाराबाबत नुतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे कार्यशाळा घेण्यात आली व उपस्थितांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक १०६४ व जळगाव कार्यालयाचे संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी नमुद असलेली पत्रके वाटण्यात आली.

तसेच उद्या रविवार दिनांक 07/08/2022 रोजी सकाळी 06.00 वाजता जळगाव शहरातील “भाऊंचे उद्यान”, काव्यरत्नावली चौक ते मेहरूण तलावपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सायकल रॅली मेहरूण तलावाजवळ संपल्यानंतर त्याठिकाणी लाचलुतपत प्रतिबंधक कायद्याबद्दल व कामकाजा संदर्भात तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी सांगितले. सदर रॅलीकरीता जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे सर्व अधिकारी व अंमलदार हजर राहणार आहेत.

Post Views: 367
Previous Post

भगिनी मंडळ नर्सिंग कॉलेजच्या वतीने जागतिक स्तनपान सप्ताहनिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आडगाव येथे पदयात्रेचे आयोजन

Next Post
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आडगाव येथे पदयात्रेचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आडगाव येथे पदयात्रेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us