लोकप्रवाह, चोपडा दि. १४ आॕगस्ट – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने कोरोना काळात रुग्णांची सेवा करून ज्यांनी जनसामान्यांना देवत्वाची प्रचिती आणून दिली त्या डॉक्टरांनी आपले देखील योगदान म्हणून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. दिनांक 15 ऑगस्ट 2022 वार सोमवार रोजी सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत दंतरोग, मुखरोग, नेत्ररोग तसेच स्री-रोग तपासणी करण्यात येणार आहे. सदर तपासणी सर्वच स्तरातील नागरिकांसाठी विनामूल्य अर्थात मोफत असणार आहे. यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट आणि यशोधन व मातृत्व हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नारायण वाडी,चोपडा येथील यशोधन हॉस्पिटल येथे सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
काॕम्प्युटरच्या मदतीने चष्म्याच्या नंबर काढणे, काचबिंदू व मोतीबिंदू तपासणी, दातांची ठेवणं नीट करणे, स्त्री रोग चिकित्सा, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर तपासणी, मासिक पाळीच्या समस्येबाबत निदान, संतती प्राप्तीसाठी सल्ला व मार्गदर्शन मिळणार..
यावेळी काॕम्प्युटरच्या मदतीने चष्म्याच्या नंबर काढणे, काचबिंदू व मोतीबिंदू तपासणी, दातांची ठेवणं नीट करणे, स्त्री रोग चिकित्सा, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर तपासणी, मासिक पाळीच्या समस्येबाबत निदान, संतती प्राप्तीसाठी सल्ला व मार्गदर्शन आदी प्रकारच्या तपासणी करण्यात येणार आहेत. सदर शिबिराचा ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येत लाभ घ्यावा असे आवाहन यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा डॉ.राहुल पाटील आणि मातृत्व हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.सुरेखा पाटील यांनी केले आहे.