Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

क्लास वन महिला अधिकारीस बेड्या; अवघ्या काही हजाराची लाच भोवली!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 12, 2022
in क्राईम
0
क्लास वन महिला अधिकारीस बेड्या; अवघ्या काही हजाराची लाच भोवली!!

कोल्हापूर, 11 ऑगस्ट : राज्यसेवा किंवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देवून अधिकारी होण्याचं लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. अतिशय मोजके विद्याथी ही परीक्षा पास होतात. त्यामुळे ही परीक्षा पास झाल्यानंतर आपण त्या पदाची जबाबदारीची जाणीव, मर्यादा आणि आदर राखला पाहिजे. कारण खूप खडतर प्रवास करुन आपण त्या पदापर्यंत पोहोचलेलो असतो. विशेष म्हणजे सर्वसामान्य, गरीब जनेतेच्या सेवेसाठी आपण कार्यरत आहोत, ही गोष्ट अधिकाऱ्यांनी विसरायला नको. पण काही अधिकारी विसरतात आणि पैशांच्या लोभापाई नागरिकांना लुबाडण्याचं काम करतात.

सर्वसामान्य नागरिकांचं काम करण्यासाठी त्यांच्याकडून लाच घेतात. पण असं लाच घेणं एका महिला अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. आणि ही अधिकारी म्हणजे साधीसुधी अधिकारी नाही तर मुख्य प्रशासकीय पदावरील महिला अधिकारी आहे. या महिला अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलं आहे. त्यामुळे महिला अधिकाऱ्याचे कृत्य जगजाहीर झाले आहेत. विशेष म्हणजे राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह आहे. राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सण साजरा केला जातोय. या दरम्यान कोल्हापुरातून अशाप्रकारची बातमी समोर आली आहे.

कोल्हापुरात एक महिला मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला लाच घेताना अटक झाली आहे. भावना चौधरी असं या महिला प्रशासकीय अधिकारीचं नाव आहे. संबंधित महिला अधिकारी ही क्लास वन अधिकारी आहे. पण तरीही या महिलेने अशाप्रकारचं कृत्य केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महिला अधिकाऱ्याविरोधात एसीबीकडे 56 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली होती. एसीबी अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत कारवाई केली आणि महिला अधिकाऱ्याला अटक झाली. संबंधित महिला अधिकारी भावना चौधरी या कोल्हापूरच्या आरोग्य सेवा मंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत होत्या. तक्रारदार व्यक्तीने त्यांचे भविष्य निर्वाह निधीतील 6 लाख 72 हजार रुपये मंजूर करण्यासाठी विनंती केली होती. पण त्यासाठी मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी यांनी रकमेच्या 10 टक्के प्रमाणे लाच मागीतली होती. अखेर तडजोडीअंती 5 हजार रुपये देणे निश्चित झालं होतं. तक्रारदार व्यक्तीने महिला अधिकाऱ्यासोबत लाचेबाबत तडजोड करुन 5 हजार रुपये निश्चित केले. त्यानंतर एसीबीकडे तक्रार केली.

त्यांच्या तक्रारीची दखल घेत एसीबी अधिकारी कामाला लागले. त्यांनी सापळा रचला आणि महिला अधिकाऱ्याला रंगेहात लाच घेताना पकडण्याचं ठरवलं. एसीबी अधिकाऱ्यांनी केलेल्या तयारीनुसार अगदी तसंच घडलं आणि त्यांनी रचलेला सापळा यशस्वी ठरला. एसीबी अधिकाऱ्यांनी महिला अधिकाऱ्याला रक्षाबंधनाच्या दिवशी लाच घेताना रंगेहाथ पकडलं. विशेष म्हणजे ऑफिसमध्ये अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम सुरू असताना आरोग्य उपसंचालक मात्र लाच घेण्यात व्यस्त होत्या. या लाचखोर अधिकाऱ्याचा पर्दाफाश लाचलुचपत विभागाने करत रंगेहाथ ताब्यात घेतले. आरोग्य उपसंचालक असलेल्या भावना चौधरी यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. एका बाजूला अमृत महोत्सवी कार्यक्रम सुरू असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी हे काम मंजूर करण्यासाठी तक्रारदाराला कार्यालयात बोलवून घेतले होते. यावेळी 5 हजार रुपयांची लाच घेताना त्या लाचलुचपत विभागाच्या ताब्यात अलगद सापडल्या.

सदर कारवाई राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक, पो.हे.कॉ.शरद पोरे, पो.कॉ संदीप पडवळ, पो.कॉ.मयूर देसाई, पो.कॉ.रुपेश माने, म.पो.कॉ.छाया पाटोळे आदिंच्या पथकाने केली.

Post Views: 350
Previous Post

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त प्रताप विद्या मंदिराची भव्य जनजागृती रॅली!!

Next Post

चोपडा येथे दंत, मुखरोग, नेत्र व स्री-रोग तपासणी शिबीर; यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट व यशोधन हॉस्पिटल आणि मातृत्व हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम

Next Post

चोपडा येथे दंत, मुखरोग, नेत्र व स्री-रोग तपासणी शिबीर; यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट व यशोधन हॉस्पिटल आणि मातृत्व हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us