लोकप्रवाह, चोपडा दि.०३ – येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. पवन डोंगर पाटील हे कर्तव्यावर असतांना आरोपी सुदाम पाटील, रा. खाचणे याने फिर्यादी डॉक्टरांची शर्टची कॉलर पकडुन शिवीगाळ, दमदाटी तसेच धक्का बुक्की करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन डोंगर पाटील रा.भाई कोतवाल रोड चोपडा हे दिनांक ०३/०९/२०२२ रोजीचे सकाळी १०/३० वा.ते १०/४५ वाजे दरम्यान रुम क्रमांक २६ मध्ये जनरल ओपीडीचे पेशंट यांचेवर औषधोउपचार करीत असतांना आरोपी नामे- सुदाम पाटील (पुर्ण नाव माहीत नाही) वय अंदाजे ५० वर्ष रा.खाचणे ता.चोपडा हा त्याची पत्नी नामे अनुसयाबाई सुदान पाटील हिचे थुंकीचे रिपोर्ट घेवून आले नंतर फिर्यादी हे सदर रिपोर्ट चेक करुन आरोपीतास तोंडाला रुमाल बांधण्यास सांगीतल्याचा राग आल्याने आरोपी याने फिर्यादी डॉक्टर यांच्या शर्टची कॉलर पकडुन यांना शिवीगाळ, दमदाटी तसेच धक्का बुक्की करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणुन सि.सि.टी.एन.एस. (भाग-५) गुरनं. ३८१/२०२२ नुसार कलम ३५३,३२३, ५०४, ५०६, महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आमि वैद्यकीय सेवासंस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम २०१० चे कलम ४, प्रमाणे चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.पोलीस निरिक्षक अजित सावळे करीत आहेत.