Wednesday, June 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
in चोपडा, शैक्षणिक
0
चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यात दादासाहेब डॉ. सुरेश पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पंकज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच समाजकार्य महाविद्यालयातील सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मेळाव्याची सुरुवात नितीन बारी (अध्यक्ष, एन-मुक्ता जळगाव जिल्हा) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख अतिथी म्हणून कांचन महाजन व पवन पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. के. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. डॉ. चंद्रकांत देवरे यांनी संघटनेचे गीत सादर केले, तर प्रास्ताविक प्रा. डॉ. लालचंद पटले यांनी मांडले. व्यासपीठावर प्रा. डॉ. रमाकांत बागुल, प्रा. डॉ. हरीष चौधरी व प्रा. डॉ. क्रांती वाघ उपस्थित होते.

या मेळाव्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व पदोन्नती प्राप्त प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित सदस्यांनी आपल्या विविध समस्या व मागण्या मांडल्या. त्यावर नितीन बारी यांनी मार्गदर्शन करत, समस्या सोडवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. अनंत देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. कुणाल गायकवाड, प्रा. डॉ. किशोर पाठक तसेच चोपडा समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहभोजनानंतर मेळाव्याची आनंददायी वातावरणात सांगता झाली.

Post Views: 114
Previous Post

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा उल्लेखनीय निकाल : पियूष बारी विद्यालयात प्रथम

Next Post
महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा उल्लेखनीय निकाल : पियूष बारी विद्यालयात प्रथम

महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा उल्लेखनीय निकाल : पियूष बारी विद्यालयात प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us