लोकप्रवाह, चोपडा दि. २ – तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी.बी.निकुंभ हायस्कुल, घोडगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास संसाधन योजने अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील इयत्ता ८ वीत शिकणाऱ्या गरजू मुलींना घर ते शाळा ये-जा करण्यासाठी ३९ सायकल व शाळेतील पालक-शिक्षक संघ यांच्या वतीने १६ अशा एकूण ५५ सायकलींचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांसाठी इयत्ता ६ वीतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजाभाई मयूर, अध्यक्षा शैलाबेन मयूर, सचिव माधुरी मयूर तसेच इंदिराताई पाटील यांचे स्वागत नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी यांनी केले. यावेळी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या एनएमएसएस परीक्षेत शाळेतील हेमांगी संदीप जैन ही विद्यार्थिनी मेरिटमध्ये आल्याने तिला अठ्ठेचाळीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती चार वर्षांसाठी मिळाल्याबद्दल शैलाबेन मयूर यांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. तसेच परिसरातील कुसूंबा येथील रहिवासी व शाळेचा माजी विद्यार्थी अक्षय मणीलाल पाटील हा युपीएससी परीक्षेत ३११ वी रँक मिळवून ईपीएफओ विभागात नियुक्ती मिळाल्याबद्दल त्याचे कौतुक व सत्कार राजाभाई मयूर यांच्या हस्ते करण्यात आला.
नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून एसएनआरजी इंग्लिश मिडियम स्कुलद्वारे घोडगाव परिसरातील मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय तसेच आयटीआयच्या माध्यमातून व्यावसायिक कौशल्य मिळवण्याची सोय केली आहे सोबतच पदवीच्या शिक्षणाची सोयही घोडगाव परिसरातील दहा गावांसाठी करण्याचा मानस नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी यांनी आपल्या मनोगतात सांगितले, महिला सक्षमीकरण करणे ही काळाची गरज असली तरी त्याची सुरुवात शालेय जीवनातून होणे अपेक्षित आहे असे मत शाळेच्या माजी विद्यार्थिनी व माजी जि.प. उपाध्यक्ष इंदिराताई पाटील यांनी मांडले, मुलींच्या पंखांना बळ देणे व त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे काम शाळा करत असते. शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक माधुरी मयूर यांनी केले, मुलींच्या विकासात शाळा व पालक यांचा सहभाग असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील मुलींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे विचार शैलाबेन मयूर यांनी मांडले, ग्रामीण भागातील मुलींना व पर्यायाने महिलांना सक्षम करण्यासाठी शाळेच्या अशा उपक्रमांचा लाभ होतो शाळेकडून झालेला सत्कार हा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे अशी भावना अक्षय मणिलाल पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी मंचावर विवेकानंद प्रतिष्ठान चोपडाचे उपाध्यक्ष व जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, सिनेट सदस्य व चोपडा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष भूपेंद्रभाई गुजराथी, उद्योजक सुनील जैन, नेमीचंद जैन, प्रताप विद्या मंदिराचे समन्वयक गोविंद गुजराथी, माजी मुख्याध्यापक ए.ए.ढबु, घोडगाव सरपंच इंदूबाई भिल, उपसरपंच संतोष कोळी तसेच परिसरातील मान्यवर मंडळी पालक यांच्यासह संस्थेचे संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.ए. पाठक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आर.पी.चौधरी व पर्यवेक्षक व्ही.ए.नागपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...