Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी ‘देसी’ अभ्यासक्रमाचा शुभारंभ

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 3, 2022
in शेती विषयक
0
कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी ‘देसी’ अभ्यासक्रमाचा शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ३  – नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कृषि तंत्र विद्यालय, अडावद येथे सुरु होणाऱ्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमाच्या (DAESI) दुसऱ्या बॅचचा शुभारंभ चोपडा येथे दि. २ रोजी संपन्न झाला. मॅनेज हैदराबाद, वनामती नागपूर, आत्मा जळगाव आणि कृषी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत भगिनी मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय अडावद यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रमात भविष्यात सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी (माजी विधानसभा अध्यक्ष) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विचार मांडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केले. बीजभाषण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा जळगाव वक्ते संभाजीराव ठाकूर यांनी शेतीला जैविक शेती शिवाय पर्याय नाही आणि तसेच शाश्वत शेती करण्यासाठी शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभे  करावेत, असे त्यांनी आपल्या भाषणात कृषी निविष्ठा दुकानदार यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले कृषी विभाग उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उपसंचालक जळगाव कुरबान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी जाधवर, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे आणि डॉ. हेमंत बाहेती (समन्वयक कृषी विज्ञान केंद्र जळगाव) यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. आपल्या भाषणात बोलताना भोकरे यांनी देसी प्रोग्राम कसा सुरू झाला का राबवला गेला व त्याचे महत्त्व काय हे प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रकल्प उपसंचालक तडवी यांनी देसी अभ्यासक्रमाचे स्वरूप व परीक्षा पद्धती व प्रात्यक्षिक भेटी याबद्दल सविस्तर माहिती प्रशिक्षणार्थीना दिली.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून चोपडा तालुका बियाणे खते व औषधे असोसिएशनचे अध्यक्ष नेमीचंद जैन, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, व्हा. चेअरमन प्रवीण गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी तसेच चोपडा परिसरातील प्रयोगशील शेतकरी यांची विशेष उपस्थिती होती. पदविका अभ्यासक्रमाचे कृषि निविष्ठा प्रशिक्षणार्थी ७० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात भगिनी मंडळ संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी यांनी ‘सेंद्रिय शेती काळाची गरज’ यावर प्रकाश टाकला. तर आशिष गुजराथी यांनी आपल्या मनोगतात ‘कमी पाण्यावर कमी औषधांचा वापर करून शेतीचा खर्च कसा कमी करता येईल आणि शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल’ याविषयी आपले विचार मांडले.
यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आशिष गुजराथी, ललित कला केंद्रचे प्राचार्य राजेंद्र महाजन तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि भगिनी मंडळ संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचारी यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल माळी (प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, अडावद) यांनी केले.  कृषि तंत्र विद्यालय अडावद येथील शिक्षकवर्ग सीमा पाटील, किरण साळुंके व प्रकाश धनगर यांनी कार्यक्रम आयोजनात विशेष सहकार्य केले. सेवानिवृत्त ज्ञानेश्वर पाटील (सुलभकर्ता, देसी अभ्यासक्रम केंद्र अडावद) यांनी आभार व्यक्त केले.
Post Views: 328
Previous Post

चोपडा उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांना धक्काबुक्की; चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल!!

Next Post

चोपडा शहरात आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले गणेशभक्तांचे स्वागत; विसर्जन मिरवणूकी दरम्यान केला अनेकांनी पक्ष प्रवेश!!

Next Post
चोपडा शहरात आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले गणेशभक्तांचे स्वागत; विसर्जन मिरवणूकी दरम्यान केला अनेकांनी पक्ष प्रवेश!!

चोपडा शहरात आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले गणेशभक्तांचे स्वागत; विसर्जन मिरवणूकी दरम्यान केला अनेकांनी पक्ष प्रवेश!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us