लोकप्रवाह, चोपडा दि. १३ – येथील चोपडे शिक्षण मंडळ संचलित प्रताप विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनी वेटलिफ्टींग या क्रिडाप्रकाराच्या स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये 95 किलो वजनी गटात इयत्ता ११ वी चा विद्यार्थी गणेश दिपक महाजन याने तर 64 किलो वजनी गटात इयत्ता 11 वी ची विद्यार्थींनी प्रज्ञा विनायक महाजन हिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत विभागस्तरावर निवड झाली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. यामध्ये सर्वप्रथम वेटलिफ्टिंग या खेळाची स्पर्धा रावेर येथील सरदार जी,जी. हायस्कूल या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेत चोपडा तालुक्यातून प्रताप विद्या मंदिरातील एकूण 03 मुली व 04 मुले यांनी सहभाग घेतला असता इयत्ता ११ वी चा विद्यार्थी गणेश दीपक महाजन (95+किलो वजनी गट) व इयत्ता ११ वी ची विद्यार्थीनी प्रज्ञा विनायक महाजन (64 किलो वजनी गट) या खेळाडूंची जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून विभाग स्तरावर निवड झाली. तसेच इयत्ता १२ वी ची विद्यार्थीनी मोहिनी रामकृष्ण महाजन, इयत्ता ११ वी ची देवयानी अमृत पवार यांनी द्वितीय क्रमांक तर इयत्ता १० वी चा विद्यार्थी तुषार कैलास इंगळे याने तृतीय क्रमांक पटकावून स्पर्धेत भरीव अशी कामगिरी केली. सदर विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख एस.एस.पाटील व क्रीडा शिक्षक एन.एन.महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कौतुक केले.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...