Thursday, September 10, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

दिड लाखाची लाच घेतांना शहर तलाठी व मंडळ अधिकारी यांना रंगेहात अटक!!; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा यशस्वी सापळा

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
October 13, 2022
in क्राईम
0
दिड लाखाची लाच घेतांना शहर तलाठी व मंडळ अधिकारी यांना रंगेहात अटक!!; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा यशस्वी सापळा
लोकप्रवाह, अमळनेर, दि.१३ – महसूल विभागामार्फत जमा केलेल्या डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या  मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे शहर तलाठी गणेश राजाराम महाजन व मंडळाधिकारी दिनेश शामराव सोनवणे यांनी पंचासमक्ष 1,50,000/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम शहर तलाठी गणेश राजाराम महाजन यांनी तलाठी कार्यालय अमळनेर येथे पंचांसमक्ष स्वीकारताच दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
आलोसे गणेश राजाराम महाजन, शहर तलाठी, अमळनेर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर येथील ३० वर्षीय तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे 3 डंपर आहेत व करारनामा तत्वावर विकत घेतलेले 3 डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर क्रं.MH18 AA 1153 हे अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे 2 महिन्यापुर्वी तहसील कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आलेले होते. सदरचे डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे गणेश राजाराम महाजन, वय-४६ वर्ष, व्यवसाय-नोकरी, तलाठी, अमळनेर शहर. रा.नविन बस स्टॅण्डजवळ, पाळधी, ता.धरणगाव व दिनेश शामराव सोनवणे, वय-४८ वर्षे, व्यवसाय-नोकरी, मंडळ अधिकारी, अमळनेर रा.फरशी रोड, अमळनेर. ता.अमळनेर  यां दोघांनी पंचासमक्ष 1,50,000/-रुपये लाचेची दि.१२/१०/२०२२ रोजी मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम 1,50,000/-रुपये दि. १३/१०/२०२२ रोजी शहर तलाठी गणेश महाजन यांनी तलाठी कार्यालय, अमळनेर येथे पंचांसमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.
आलोसे. दिनेश शामराव सोनवणे, मंडळाधिकारी
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील यांचे नेतृत्वात स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ. अशोक अहीरे, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना. बाळु मराठे, पो.ना. सुनिल वानखेडे, पो.ना. ईश्वर धनगर, पो.कॉ. महेश सोमवंशी, पो.कॉ. प्रदिप पोळ, पो.कॉ. राकेश दुसाने, पो.कॉ. सचिन चाटे, पो.कॉ. प्रणेश ठाकुर, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी आदिंच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव पोलीस निरिक्षक एन.एन.जाधव करीत आहेत.
  
Post Views: 669
Previous Post

रोटरीतर्फे 121 दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम पायांचे वितरण

Next Post

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रताप विद्यामंदिराचे विद्यार्थी गणेश महाजन व प्रज्ञा महाजन प्रथम !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us