लोकप्रवाह,चोपडा दि. ०२ – जगातील सर्वात मोठी शिक्षण व्यवस्था भारतात आहे. देशात ११०० विद्यापीठे असून, चार कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. समाजाच्या मोठ्या अपेक्षा आपल्या शिक्षण व्यवस्थेकडून आहेत. जगात ज्या पद्धतीने शिक्षण दिले जाते आहे त्या तुलनेत आपली शिक्षण व्यवस्था कुठे आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. डॉ. विजय माहेश्वरी यांनी केले.
भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाचे कला व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन, सुशील शिक्षक पुरस्कार समारंभाचे आयोजन, गुरुवारी भगिनी मंडळ संस्थेतर्फे करण्यात आले होते. त्यावेळी कुलगुरूंनी मार्गदर्शन केले. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी अध्यक्षस्थानी होते. कला व वाणिज्य महाविद्यालयाचे उद्घाटन कुलगुरूंच्या हस्ते झाले. यंदाचा भगिनी मंडळ शैक्षणिक संस्थेचा सुशील शिक्षक पुरस्कार २०२२ हा प्रा. डॉ. अनंत देशमुख यांना कुलगुरू प्रा. डॉ.माहेश्वरी यांच्याहस्ते देण्यात आला. कार्यक्रमात बीजभाषक जयदीप पाटील यांनी “शिक्षण काल आज आणि उद्या” या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पुनम गुजराथी यांनी केले. यावेळी त्यांनी संस्थेविषयी माहिती दिली तसेच सुशील शिक्षक पुरस्कारार्थीचे नांव सुद्धा त्यांनीच घोषीत केले.
११ लाखाची देणगी !!
डॉ. दीपक गुजराथी यांनी भगिनी मंडळ संस्थेला ११ लाखांची देणगी दिली. अरुणभाई गुजराथी यांनीही विचार मांडले. आज गरीब शिकू शिकत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे. चांगल्या शिक्षणातुन व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला पाहिजे. त्या बरोबर मानवतेचाही विकास होणे आवश्यक आहे. गरीबांसाठी शिक्षण व्यवस्था उभे करण्याची आवश्यकता आहे, असे अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार कैलास पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप पाटील, माजी जि.प. अध्यक्ष गोरख पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन अॕड. घन:श्याम पाटील, गटनेते जीवन चौधरी, आशिष गुजराथी, विवेकानंद प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, चोपडा पिपल्स बँकेचे व्हाईसचेअरमन सुनिल जैन, संचालक नेमिचंद जैन, अशोक अग्रवाल, प्रा. आशिष गुजराथी, सुनिल गुजराथी, डॉ. नितीन बारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष शामसिंग परदेशी, माजी सभापती गिरीष पाटील, संजय कानडे आदिंसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक संजय बारी यांनी तर आभारप्रदर्शन प्रेरणा मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय चौधरी यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगिनी मंडळ शैक्षणिक संस्थेतील सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद आदिंनी परिश्रम घेतले.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...