लोकप्रवाह, चोपडा दि. ०३ नोव्हें. (संदिप ओली)
तालुक्यातील चहार्डी ग्रामपंचायत येथे मासिक सभा सुरु असतांना कोमलबाई बापुराव पाटील रा. चहार्डी यांनी विनापरवागगी मासिक सभेत प्रवेश केला. ग्रामविकास अधिकारी एस. आर. पारधी यांच्यामुळे रोजंदारी कामावरुन कमी केले व पेपरात नाव आले त्यामुळे बदनामी झाली या कारणावरुन वाद करुन ग्रामसेवक यांची शर्टाची कॉलर पकडुन धक्का बुक्की करीत मारहाण करण्याची धमकी दिली व शासकिय कामात अडथळा निर्माण केला म्हणून कोमलबाई बापुराव पाटील यांचे विरुध्द चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुकदेव रामसिंग पारधी वय – 47 धंदा – नोकरी (ग्रामविकास अधिकारी) रा. वृंदावनधाम, चोपडा जि. जळगांव यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली की, चहार्डी ग्रामपंचायतीला जुलै 2020 पासुन ग्रामविकास अधिकारी म्हणून नेमणुकीस आहे. चहार्डी ग्रामपंचायत येथे दैनदिन कामकाजाकरीता कोमलबाई बापुराव पाटील, धर्मराज रमेश खैरनार इत्यादी कर्मचारी यांना सरंपच यांच्या अधिकाराने रोजंदारीने कामावर ठेवण्यात आले होते. यापैकी कोमलबाई पाटील यांनी ग्रामपंचायत चहार्डी येथे रोजंदारीने काम करीत असतांना सरंपच किंवा ग्रामसेवक यांच्याकडुन कोणत्याही प्रकारची पुर्वपरवानगी न घेता स्वतः तसेच तिच्यासोबत इसम नामे योगिनी मधुकर पाटील व गोपाल धनराज कोळी या व्यक्तींच्या नावे ग्रामपंचायत गावठाण जागेवर नमुना क्रंमाक 8 वर नोंदवुन घेतल्याचे निर्दशनास आल्याने कोमलबाई पाटील यांना दिनांक 30/11/2022 रोजीच्या ग्रामसभेत ठराव करुन रोजंदारी कामावरुन कमी करण्यात आले.
त्यानंतर आज दिनांक 03/12/2022 रोजी सकाळी ११ वाजता चहार्डी ग्रामपंचायत येथील सभागृहामध्ये मासिक सभा सुरु असतांना कोमलबाई बापुराव पाटील या कोणाचीही पूर्व परवानगी न घेता मासिक सभेत आल्या व दिनांक 30/11/2022 रोजीच्या ग्रामसभेत स्वतः तसेच तिचे सोबत इसम नामे योगिनी मधुकर पाटील व गोपाल धनराज कोळी या व्यक्तीचे नावे ग्रामपंचायत गावठाण जागेवर नमुना क्रंमाक 8 वर नोदंवून घेतल्याची माहिती दिल्यामुळे कामावरुन कमी करण्यात आले व सदर बाब ही वर्तमान पेपरात आल्यामुळे बदनामी झाली आहे असे सांगुन हातवारे करुन जोरजोरात बोलुन ग्रामसेवक यांच्याशी वाद केला. टेबलावरील फाईली फेकून दिल्या तसेच शर्टची कॉलर पकडुन दमदाटी करीत धक्का बुक्की करीत मारहाण करण्याची धमकी दिली. यामुळे सदर महिला कोमलबाई बापुराव पाटील यांचेवर ग्रामसेवक यांची शर्टची कॉलर पकडुन धक्का बुक्की करीत मारहाण करण्याची धमकी दिली व शासकिय कामात अडथळा निर्माण केला म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस भाग ५ गुरनं. ५०३/२०२२ नुसार भादंवि कलम ३५३, ३२३, १८६, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत. याप्रकरणी पोलीसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे.
Post Views: 1,055