लोकप्रवाह, चोपडा दि. २८ डिसें. (संदिप ओली) – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘कार्निवल 2022’ मधून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे अनोखे दर्शन घडविण्यात आले. ‘अतुल्य भारत’ या संकल्पनेवर आधारित विविध राज्यांच्या पारंपारिक नृत्यांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी सहा. पोलीस अधिक्षक कृषिकेश रावळे (IPS), चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी हेमंतकुमार निकम, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, संचालक डी. बी. देशमुख, डॉ. चंद्रकांत बारेला, डॉ. सोनाली बारेला, डॉ. अतुल पाटील, डॉ. हर्षिता पाटील, डॉ. ललित चौधरी, कल्याणी चौधरी, अर्चना निकम, नीता अग्रवाल, चेतन टाटिया, प्रियंका टाटिया, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. रक्षिता पाटील, डॉ. सचिन काटे, डॉ. योगिता काटे, डॉ. आनंद पाटील, डॉ. सोनाली पाटील, डॉ. सिद्धार्थ साळुंखे, तेजस्विनी साळुंखे, अॕड. उमेश पाटील, अॕड. किरण जाधव, प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, निवृत्त शिक्षक रमेश शिंदे, मधुकर पाटील, डॉ. महेंद्र पाटील, डॉ. आर. टी. जैन, , शशिकांत साळुंखे, मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे, प्रा. दीनानाथ पाटील, अशोक साळुंखे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती उपस्थित होते.
याप्रसंगी आयपीएस अधिकारी कृषिकेश रावळे आणि डॉ. चंद्रकांत बारेला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी शाळेच्या यशस्वी उपक्रमांबद्दल आणि विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशासंदर्भात माहिती दिली. शाळेतील विद्यार्थी प्रमुख प्राजक्ता चौधरी, तुषार चौधरी यांनी मनोगत वक्त केले. विद्यार्थ्यांनी विविध स्तरावर विविध खेळ व स्पर्धेत प्राप्त केलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी स्नेहसंमेनात बक्षीस वितरण करण्यात आले.
शाळेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी मेडिकल, ९ विद्यार्थी इंजिनिअरिंग, दोन विद्यार्थी आर्किटेक्चर, ३ विद्यार्थी बी.बी.ए तर इतर विद्यार्थी डी.फार्मसी, बी. फार्मसी, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, कांप्युटर इंजीनियरिंग यांसारख्या विविध नामांकित शाखांमध्ये प्रवेशित झाले आहेत. ८ विद्यार्थ्यांनी जीटीएस इ.च्या गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले. होमी भाभा, नासो यासारख्या विविध स्पर्धापरीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. होमी बाबा बाल वैज्ञानिक कॉम्पिटिशन मध्ये दक्ष जयस्वाल या विद्यार्थ्यांने विशेष गुणवत्तेचे प्रशस्तीपत्र प्राप्त केले.
विविध खेळांमध्ये देखील ऑक्सफर्ड शाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. बॅडमिंटन, बुद्धिबळ, कराटे यांसारख्या विविध खेळात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे यावेळी पारितोषिक देत कौतुक करण्यात आले. पिकलबॉल या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त करणाऱ्या अंजली पोळ आणि जिनिषा क्षीरसागर या विद्यार्थ्यांनींचे कौतुक करण्यात आले. बुद्धिबळ स्पर्धेत विभागावर निवड झालेल्या संस्कृती शिंदे या विद्यार्थ्यानीचेही कौतुक करण्यात आले.
रंगोत्सव सेलिब्रेशन : ऑर्गनायझेशन फॉर नॅशनल लेवल आर्ट कॉम्पिटिशन, या संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेमध्ये रंगभरण कोलाज सुंदर हस्ताक्षर टॅटू मेकिंग या विविध कला प्रकारामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले. पूर्वा अमोल देशमुख या विद्यार्थिनीने ‘कोलाज’ या कला प्रकारात राष्ट्रीय स्वरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. रंगभरण स्पर्धेमध्ये गार्गी कांतीलाल जैन (इयत्ता दुसरी) आणि मंजुश्री बापूसाहेब शिंदे (इयत्ता पाचवी) या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक प्राप्त केला. याव्यतिरिक्त आर्ट मेरिट अवॉर्ड पाच विद्यार्थ्यांना मिळाले. सुपर गिफ्ट अवॉर्ड दोन विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. सतरा विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले. आठ विद्यार्थ्यांनी स्मृतिचिन्ह प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांना या समारंभात सन्मानित करण्यात आले. कलाशिक्षक शकील अहमद यांना रंगोत्सव तर्फे कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि प्रिन्सिपल ममता कपिल न्याती यांना रंगोत्सव तर्फे गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थिनी स्पंदन उत्तम सोनकांबळे हिची ‘एज्यू मित्र इंटलेक्ट’ या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेस सफारी रेसिडेन्शियल कॅम्पसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थिनीचेही अभिनंदन करण्यात आले. अतुल्य भारत या संकल्पनेवर आधारित भारताच्या विविध राज्यांचे सांस्कृतिक दर्शन विविध नृत्य आणि नाटिकांच्या माध्यमातून घडविण्यात आले. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या नाटिकेसाठी शाळेतील शिक्षिका साक्षी बिडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाची प्रस्तावना अमन पटेल, अश्विनी पाटील यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमन पटेल, दीप्ती पाटील, हेमांगी पाटील, कल्पना बारी, नबिला खान, साक्षी बिडकर या शिक्षकांसह इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले तर आभारप्रदर्शन कल्पना बारी, जयश्री सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या अनुषंगाने शाळेतील कलाशिक्षक शकील अहमद यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. शाळेतील नृत्य शिक्षिका दिपाली पाटील यांनी विविध नृत्य प्रकारांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...