लोकप्रवाह, चोपडा दि. २४ जाने. (संदिप ओली) – जिल्हयात अवैद्य धंदयावर प्रतिबंध करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करण्याबाबत सुचना देवून योग्य ती कारवाई करणेबाबत जिल्हयातील सर्व उविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना वरिष्ठांकडून आदेश निर्देशीत केले होते. या अनुषंगाने प्रभारी सपोनि. संदिप दुनगहू यांना दि. २३ जानेवारी रोजी सांगवी (शिरपूर) कडून एक महिंद्रा बोलेरो या चारचाकी वाहनामध्ये अवैद्यरीत्या बिअर वाहतूक होत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी त्याठिकाणी तातडीने पथक पाठविण्यात आले. संबंधित चारचाकी वाहनाची तापासणी केली असता त्यामध्ये तब्बल ८४ हजार रुपये किंमतीच्या बिअरची अवैद्यरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. बिअरची वाहतुक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यात एकुण ४,८४००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि. संदिप दुनगहू यांना गुप्त बातमिदारामार्फत बातमी मिळाली की, दि. २३ जाने २०२३ रोजी सांगवी ता. शिरपूर कडून एक महिंद्र बोलेरो गाडी क्र MH – 19 AP – 0965 मध्ये अवैदयरित्या बिअरची वाहतूक होत आहे. त्या अनुषंगाने त्यांनी पोहेकॉ. लक्ष्मण शिंगणे, पोहेकॉ. राकेश पाटील, पोकॉ. प्रमोद पारधी, चापोकॉ. विनोद पाटील यांना त्याठिकाणी जावून कारवाई करणेबाबत सांगितले. सदर पथक सरकारी वाहनाने त्याठिकाणी रवाना होवून खा-यापाडा गावाचे हद्दीत लहान पुलाजवळ जावून पाहणी केली असता मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सुमारे दुपारी १७.४५ वाजेच्या सुमारास एक बोलेरो गाडी क्र. MH -19 AP – 0965 येतांना दिसली असता तिची तपासणी केली तर त्यामध्ये माऊंटस ६००० सुपर स्ट्रॉग कंपनीच्या ५०० ml मापाच्या अॕल्युमिनीयमचे टिन असलेले ३५ खोके एका खोक्यात २४ डब्बे असे एकुण ८४० डब्बे (बाटल्या) एका डब्ब्याची किंमत रुपये १०० दराने एकुण ८४,०००/- रु किंमतीच्या बिअरची अवैद्यरित्या वाहतुक करीत असतांना आरोपी नामे परशुराम रिता बारेला, वय ३३ वर्षे, रा. जिरायतपाडा ता. चोपडा दिलीप नारायण बारेला, वय ४० वर्षे, रा. देवझीरी ता. चोपडा हे मिळून आले. या अनुषंगाने दोघांवर गुन्हा दाखल झाला असून गुन्हयात एकुण ४,८४०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक एस. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक जळगांव चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी संदिप दुनगहू, पोहेकॉ. लक्ष्मण शिंगाणे, पोहेकॉ. राकेश पाटील, सफौ. देविदास ईशी, पोहेकॉ. भरत नाईक, पोहेकॉ. शिवाजी बाविस्कर, पोहेकॉ. राजु महाजन, पोना. शशिकांत पारधी, चालक पोकॉ. विनोद पाटील, पोकॉ. प्रमोद पारधी आदिंच्या पथकाने केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ. लक्ष्मण शिंगणे करीत आहेत.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...