Thursday, June 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

२५ हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात !

वीटभट्टी व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात मागितली होती लाच

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
January 23, 2023
in क्राईम
0
२५ हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकप्रवाह, दि. २३ जाने अमळनेर – तालुक्यातील निम गावच्या ग्रामपंचायत हद्दीत जर विटभट्टी व्यवसाय करायचा असेल तर ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल असे सांगुन निम ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात निम येथील ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष २७,५००/- रुपयांची मागणी करुन सदर लाच मागणी केलेल्या रक्कमेपैकी २५,००० /- रू रोख रक्कम पंचासमक्ष स्विकारताच ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निम येथील तक्रारदार यांचा यांचा सुमारे मागील ३० वर्षापासुन निम ग्रामपंचायतीच्या हद्दीत विटभट्टीचा व्यवसाय असून तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे तहसिल कार्यालय अमळनेर यांचे नावे 6,000/- रुपये रॉयल्टी भरलेली आहे. तरी सुद्धा तक्रारदार यांना सदर ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील, वय-५५ ग्रामसेवक, निम ग्रामपंचायत कार्यालय, वर्ग-३,  रा. सुरभी कॉलनी, मराठा मंगल कार्यालयाच्या पुढे, अमळनेर ता.अमळनेर, जि. जळगाव यांनी निम ग्रामपंचायत हद्दीत जर विटभट्टी व्यवसाय करायचा असेल तर ना हरकत दाखला घ्यावा लागेल असे सांगुन निम ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात त्यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष २७,५००/- रुपयांची मागणी करुन सदर लाच मागणी केलेल्या रक्कमेपैकी २५,००० /- रू रोख रक्कम पंचासमक्ष निम ग्रामपंचायत कार्यालयात स्वतःस्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांचेवर मारवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शनाखाली व लाप्रवि जळगांवचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरिक्षक संजोग बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली पोना. ईश्वर धनगर, पोकॉ. प्रदिप पोळ व पोकॉ. सचिन चाटे, पोलीस निरिक्षक  एन. एन. जाधव, सफौ. दिनेशसिंग पाटील, सफौ. सुरेश पाटील, पोहेकॉ. सुनिल पाटील, पोहेकॉ. रविंद्र घुगे, मपोहेकॉ. शैला धनगर, पोना. जनार्धन चौधरी, पोना. किशोर महाजन, पोना. बाळु मराठे, पोना. सुनिल वानखेडे, पोकॉ. महेश सोमवंशी, पोकॉ. राकेश दुसाने, पोकॉ. प्रणेश ठाकुर, पोकॉ. अमोल सुर्यवंशी आदिंच्या पथकाने केली.

Post Views: 551
Previous Post

आज चोपडा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाची बैठक

Next Post

अवैधरित्या दारुची वाहतूक करतांना चारचाकी वाहनासह दोन आरोपी जेरबंद

Next Post
अवैधरित्या दारुची वाहतूक करतांना चारचाकी वाहनासह दोन आरोपी जेरबंद

अवैधरित्या दारुची वाहतूक करतांना चारचाकी वाहनासह दोन आरोपी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us