लोकप्रवाह, चोपडा दि. १८ फेब्रु. (संदिप ओली) : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना करण्यात आलेली आहे. या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, जेईई/नीट, एमएचटी/सीईटी, एमपीएससी व युपीएससी आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी याकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा राबविण्यात येतो.
सन 2022 – 23 या वर्षी 11 वी विज्ञान या वर्गात प्रवेशित असलेले विद्यार्थी तसेच ज्या विद्यार्थ्यांना 10 वी त 65% पेक्षा जास्त गुण आहे अशा विद्यार्थ्यांना महाज्योतिच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करणेबाबत आवाहन करण्यात आले होते. त्याबाबत चोपडा येथील भगिनी मंडळ कॉलेज ऑफ सोशल वर्क अल्युमनी असोसिएशनचे अध्यक्ष व श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी लासुर येथील चारही विद्यार्थ्यांना फॉर्म भरणे व त्यांना ऑनलाईन लेक्चरसाठी येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे गौरव विकास ठाकरे, पूर्वेश गुणवंत महाजन, साक्षी राजेंद्र महाजन व दर्शना कैलास माळी या चार विद्यार्थ्यांना सॅमसंग कंपनीचा टॅब मिळाला असून यावर दररोज 6 जीबी नेट डाटा महाज्योतिकडून मोफत मिळणार आहे. लासुर गावातून 4 विद्यार्थीचे 40 विद्यार्थी कसे होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन जितेंद्र महाजन यांनी यावेळी केले. टॅब मिळालेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार ए. के. गंभीर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला.
यावेळी क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ (महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश) चे अध्यक्ष ए. के. गंभीर, राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष हिम्मतराव महाजन, माळी समाजाचे माजी उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र महाजन, सचिव सुरेश पवार, सहसचिव अरुण माळी, संचालक मास्टर टेलर्स, किसान विद्या प्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष अजय पालिवाल, मुरलीधर सोनवणे, विकास सोसायटी चेअरमन सुरेश माळी, पीक संरक्षण चेअरमन गोकुळ माळी, माजी व्हाईसचेअरमन किशोर माळी, विकास सोसायटी संचालक प्रकाश माळी, माजी चेअरमन एन. टी. महाजन, संचालक नोमिल पटेलिया, सामाजिक कार्यकर्ते वना पवार, आबा कोळी, देविदास मगरे, तापीराम महाजन, देवाजी माळी, प्रल्हाद महाजन, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश माळी, शाहरुख खाटीक, नाना पाटील, शाळा व्यवस्थापन समिती चे माजी अध्यक्ष योगेश्वर माळी, सरस्वती क्लासेसचे संचालक विनोद महाजन, A वन क्लासेसचे संचालक राहुल पाटील, सहसंचालक यश महाजन, निखिल महाजन, विद्यार्थ्यांचे पालक राजेंद्र महाजन, विकास ठाकरे, गुणवंत महाजन, अरुण महाजन आदींची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जितेंद्र महाजन यांनी केले.
Post Views: 153