लोकप्रवाह, चोपडा दि. १९ फेब्रु. (संदिप ओली) – जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेलेत परंतु कष्ट करणाऱ्या रयतेचे राज्य निर्माण करणारा राजा म्हणून ज्यांचा अभिमानाने उल्लेख करता येईल ते म्हणजे राजा शिवछत्रपतींचे नाव काळाच्या कपाळावर कोरले गेले आहे. तसेच स्वराज्यावर मावळ्यांनी जीव का ओवाळून टाकला हे ज्याला समजले त्याला शिवचरित्र कळले असे मत शिवव्याख्याते प्रा. संदीप भास्कर पाटील यांनी व्यक्त केले.
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालय येथे दि.१९ फेब्रुवारी रोजी इतिहास विभागातर्फे आयोजित व्याख्यानात “छत्रपती व स्वराज्यावर मावळ्यांनी आपला जीव का ओवळून टाकला” या विषयांवर पुढे बोलतांना प्रा. संदीप पाटील म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी आरंभीलेल्या स्वराज्य निर्मिती कार्यात सर्व जाती – धर्माच्या नरविरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, कारण त्यांना हे स्वराज्य जनतेच्या कल्याणाचे राज्य वाटत होतं. शिवरायांचा इतिहास केवळ बोट छाटण्याचा किंवा कोथडा काढण्याचा नसून, शेती – शेतकरी व माय माऊलींच्या अब्रूचे रक्षण करण्याचा तसेच रयतेच्या मनात सर्वोच्च नीतिमान आदर्श निर्माण करण्याचा आहे. शिवरायांचा लढा हा केवळ कुठल्या जाती धर्मासाठी नसून तो कल्याणकारी रयतेच्या स्वराज्यासाठीच होता. म्हणून शिवा काशीद, बाजी प्रभू, तानाजी मालुसरे, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर या नरवीरांसह रयतेला वाटायचे लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे!शिवरायांच्या नीतिमान आदर्श समजून घेऊन ते आचरणात आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
तत्पूर्वी संगीत विभागाचे विद्यार्थी व प्रा. किशोर खंडागळे यांनी सुरेल स्वागतगीत सादर केले. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. एन. एस. कोल्हे होते तर उपप्राचार्य प्रा. डॉ. एल. चौधरी, प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, प्रा. बी. एस. हळपे, रजिस्ट्रार डी. एम. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात गणेश कोळी या विद्यार्थ्याने शिववंदनगीत सादर केले. तर खुशल चंद्रकांत देवरे व शर्वरी दिनानाथ पाटील या इयत्ता पाचवीतील आॕक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीत सादर केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. एन. एस. कोल्हे यांनी शिवरायांच्या पुरोगामीत्वावर प्रकाश टाकला.
यावेळी प्रा. डॉ. पी. एस. लोहार, प्रा. माया शिंदे, प्रा. डॉ. शैलेश वाघ, प्रा. डॉ. अनिल सूर्यवंशी, प्रा. डॉ. चंद्रकांत देवरे, प्रा. डॉ. वैजनाथ कांबळे, प्रा. डी. पी.
सपकाळे, प्रा. दिनानाथ पाटील, प्रा. क्रांती क्षीरसागर, प्रा. डॉ. कुणाल गायकवाड, प्रा. अतुल पाटील, प्रा. समाधान पाटील, प्रा. प्रमोद पाटील, प्रा. पी. व्ही. पाटील, प्रा. भूषण पाटील, प्रा. मुकेश पाटील, प्रा. अभिजित पाटील, प्रा. भैय्यासाहेब देवरे, प्रा. सुनंदा नंनवरे, प्रा. सुवर्णा पवार, प्रा. धनश्री महाजन, महेंद्र क्षीरसागर, राकेश काविरे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...