Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग क्रिडा स्पर्धेत गणेश महाजन याने पटकाविले कास्यपदक!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 3, 2023
in खेळ, विशेष, शिक्षण
0
राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग क्रिडा स्पर्धेत गणेश महाजन याने पटकाविले कास्यपदक!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २१ फेब्रु. (संदिप ओली) : येथील प्रताप विद्या मंदिरातील 19 वर्ष वयोगटातील खेळाडू गणेश दिपक महाजन याने नुकत्याच पार पडलेल्या शालेय शासकीय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत उत्तम कामगिरी करत कास्यपदक पटकाविले. गणेश हा बोल बजरंग बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध जय बजरंग लॕंड डेव्हलपर्सचे संचालक दिपक श्रावण महाजन यांचा चिरंजीव आहे.
गणेश महाजन व दिपक महाजन यांचा सत्कार करतांना चोपडे शिक्षण मंडळाचे संचालक व उपनगराध्यक्ष भुपेंद्रभाई गुजराथी
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पूणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सांगली द्वारा आयोजीत दि. २९ जानेवारी ते ३१ जानेवारी या दरम्यान सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग क्रिडा स्पर्धेत चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरातील इयत्ता ११ वी चा विद्यार्थी गणेश महाजन याने 102 किलो वजनी गटात 170 किलो वजन उचलून तृतीय क्रमांक मिळवित कास्यपदक पटकाविले. अशी कामगिरी करणारा तो चोपडा तालुक्यातील एकमेव खेळाडू आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याचा प्रताप विद्या मंदिर येथील अध्यक्ष व संचालक मंडळाने तसेच मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सत्कार केला. त्याचप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आई – वडीलांनी दिलेली प्रेरणा व गुरुंचे मार्गदर्शन याच्या जोरावर मी इथपर्यंत पोहचु शकलो आहे. यापुढे प्रत्येक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकावणार असा दृढ निश्चय गणेश महाजन यानी लोकप्रवाहशी बोलतांना व्यक्त केला. गणेश महाजन याला प्रताप विद्या मंदीर चे क्रिडा शिक्षक आप्पा पाटील व एन.एन.महाजन यांनी मार्गदर्शन केले.
Post Views: 967
Previous Post

स्वराज्यावर मावळ्यांनी जीव का ओवाळून टाकला? याचे चिंतन झाले पहिजे – प्रा. संदीप पाटील

Next Post

मागासवर्गीय समाज जमिनीचा मालक होण्याचे स्वप्न हे एक प्रकारचे देशी गाजरच : प्रा. सुभाष वायदंडे

Next Post
मागासवर्गीय समाज जमिनीचा मालक होण्याचे स्वप्न हे एक प्रकारचे देशी गाजरच : प्रा. सुभाष वायदंडे

मागासवर्गीय समाज जमिनीचा मालक होण्याचे स्वप्न हे एक प्रकारचे देशी गाजरच : प्रा. सुभाष वायदंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us