लोकप्रवाह, चोपडा दि. ४ मार्च (संदिप ओली) : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ‘पुष्परचना प्रदर्शन स्पर्धेचे’ (Flower arrangement exhibition & competition)
आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. एम. बागुल, विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. पी. एन. सौदागर व डॉ. जे. जी. पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी. एन. सौदागर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी व उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी यांनी पुष्परचनेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विभागप्रमुख डॉ. आर. एम. बागुल यांनी पुष्परचना या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक व्यवसायिक दृष्टीकोन तयार व्हावा व विद्यार्थी पदवी घेवून बाहेर पडल्यावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावेत याकरीता असे कौशल्य विकासपर उपक्रम राबविणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. यामध्ये एकूण ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. पुष्परचना प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी टाकाऊ आणि टिकाऊ वस्तूंचा वापर करून मोगरा, झेंडू, शेवंती, गुलाब, जास्वंद, जरबेरा, चांदणी, विद्या, मका, जुनिपेरस, जास्वंद यांची फुले व पाने तसेच बांबू व परिसरातील उपलब्ध वनस्पतींचा वापर करून बनविलेले आकर्षक पुष्प्गुच्छ आणि त्याचे विविध प्रकार प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. एच. जी. सदाफुले व डॉ. जे. जी. पाटील यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक आरती ब्रिजपाल सिंह बिष्ट (द्वितीय वर्ष बी. एस्सी.) हिने मिळविला. बीना पठाण व ऋतुजा महाजन ह्यांनी दुसरा क्रमांक मिळविला तर तिसरा क्रमांक रोशनी शिंदे व नेहा महाजन यांनी प्राप्त केला. उत्तेजनार्थ पारितोषिक कोमल महाजन, आदिती शिंदे, अश्विनी कोळी व कल्याणी महाजन यांनी प्राप्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. पी. एन. सौदागर यांनी केले तर आभार डॉ. जे. जी. पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर. व्ही. पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.
Post Views: 636