Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

खळबळजनक : चोपडा तालुक्यात अस्वलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; अडावद पोलिसात नोंद!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 6, 2023
in पोलीस डायरी, ब्रेकींग न्युज
0
खळबळजनक : चोपडा तालुक्यात अस्वलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; अडावद पोलिसात नोंद!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकप्रवाह, चोपडा दि. ०६ मार्च  : तालुक्यातील अडावद पोलीस स्थानकाच्या हद्दीत अस्वलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अडावद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बिसना बांगड्या बारेला (वय ४१, रा. शेवरा बु. ता.चोपडा) असे मयताचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिसना बांगड्या बारेला हे २ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गावालगतच्या जंगलात आपल्या जनावरांच्या शोधात गेले होते. याचवेळी अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अस्वलाने बारेला यांच्या चेहऱ्यावर चावा घेतल्याने त्यांचे दोघं डोळे फुटले. अस्वलाच्या हल्ल्यामुळे मयताचा चेहरा अत्यंत विद्रूप झालेला होता.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी उपचाराकामी बारेला यांना उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे दाखल केले. डॉक्टरांनी तपासले असता त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सीएमओ. डॉ. सागर पाटील (उपजिल्हा रुग्णालयात चोपडा) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक जयदीप राजपूत हे करीत आहेत.

Post Views: 2,434
Previous Post

चोपडा महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ‘पुष्परचना प्रदर्शन स्पर्धेचे’ आयोजन

Next Post

अधिकाधिक महिलांचा सन्मान होणे हेच दर्पण पुरस्काराचे यश : सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित 

Next Post
अधिकाधिक महिलांचा सन्मान होणे हेच दर्पण पुरस्काराचे यश : सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित 

अधिकाधिक महिलांचा सन्मान होणे हेच दर्पण पुरस्काराचे यश : सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us